Akshay Kumar First Flop Film: अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हटले जाते. ९० च्या दशकात त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक काळ असा होता की त्याला हिट चित्रपटांची मशीन म्हटले जायचे. पण, आता अक्षयला बऱ्याच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागत आहे. त्याने १५२ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीत, त्याने ॲक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्स अशा वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामुळे तो सुपरस्टार बनला. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप होत आहेत. पण अक्षयचा पहिला फ्लॉप चित्रपट कोणता होता हे तुम्हाला सांगता येईल का? चला याबद्दल जाणून घेऊ.

पहिला चित्रपट

अक्षय कुमारने १९९१ मध्ये राज सिप्पी दिग्दर्शित ‘सौगंध’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात अक्षय कुमार, शांती प्रिया, मुकेश खन्ना, राखी गुलजार, अमिता नांगिया, रूपा गांगुली, बीना बॅनर्जी आणि अरुण बाली असे अनेक कलाकार दिसले होते. चित्रपटाची कथा खूपच चपखल होती. इतकेच नाही तर जबरदस्त ॲक्शनसोबतच खास रोमान्सही या चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटात अक्षय आणि शांती प्रिया यांच्यातील विशेष केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Priyanka Chopra Marathi film Paani released on OTT
मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन
Marathi Cinema Actor Swapnil Joshi Jilbi Marathi Film entertainment news
स्वप्नीलचा बेधडक अंदाज

पहिला फ्लॉप चित्रपट

आता, अक्षय कुमारच्या पहिल्या फ्लॉप चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास तो हाच त्याचा पहिला चित्रपट ‘सौगंध’ होता. होय, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, पण काही विशेष करू शकला नाही. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भावली नव्हती. परंतु या चित्रपटातील सर्वच पात्रांना खूप पसंती मिळाली होती. दरम्यान, या चित्रपटानंतर अक्षयने या चित्रपटानंतर सातत्याने अनेक हिट चित्रपट दिले. परंतु अक्षय कुमारच्या करिअरची सुरुवात एका फ्लॉप चित्रपटाने झाली. असे अनेक स्टार्ससोबत घडले आहे.
हेही वाचा – फक्त एक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अक्षय कुमारचा केलेला अपमान? अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बजट आणि बॉक्स ऑफिस कमाई

३३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाची कथा प्रेम आणि बदला याभोवती फिरते. चित्रपटात अक्षय शिव नावाच्या मुलाच्या भूमिकेत आहे, जो आपल्या कुटुंबाच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात शांतीप्रियाने गौरीची भूमिका साकारली आहे, जी शिवाची प्रेयसी आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री राखी अक्षयच्या आईच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा – “काळवीटाची शिकार करणारा…”, सलमान खानने दुसऱ्याचा आरोप स्वतःवर घेतलेला? पाहा त्याचाच जुना व्हिडीओ
या चित्रपटाचे बजेट दीड कोटी रुपये होते आणि चित्रपटाने २ कोटींची कमाई केली होती, मात्र असे असतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

आजघडीला कल्ट क्लासिक

अशात हा चित्रपट कल्ट क्लासिक चित्रपट बनला आहे. जरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होता, तरीही अनेक वर्षांनंतर जेव्हा हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला तेव्हा त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. जर तुम्हीदेखील अक्षयचे चाहते असाल आणि त्याचा ॲक्शन आणि रोमान्सने परिपूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहू शकता. याशिवाय यूट्यूबवरही तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. यूट्यूबवर आतापर्यंत या चित्रपटाला दीड मिलियन लोकांनी पाहिले आहे. दरम्यान अक्षय लवकरच ‘भूत बांगला’ या आणखी एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे.


Story img Loader