आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि बोनी कपूर-श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर लवकरच ‘लव्हयाप्पा’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनाआधी, दोन्ही स्टार किड्स आपापल्या अनोख्या पद्धतीने त्याचा प्रचार करत आहेत. यामध्ये खुशीने तिची बहिण जान्हवी कपूर आणि वडील बोनी कपूर यांच्याबरोबर मजेशीर रील तयार करत चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.

‘लव्हयाप्पा हो गया’ असे या गाण्याचे नाव आहे. खुशीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर रील शेअर केली, ज्यामध्ये ती आणि जान्हवी या गाण्याचे हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. परंतु या व्हिडीओची खरी शोभा त्यांच्या वडिलांनी, बोनी कपूर यांनी वाढवली. त्यांनी रीलमध्ये अप्रत्यक्षरीत्या फोटोबॉम्ब करत गाण्याचा ‘अलाप’ भाग सादर केला, ज्यामुळे चाहत्यांची मने जिंकली.

Govinda And Shakti Kapoor
“असुरक्षितता माणसाला कुठून कुठे…”, शक्ती कपूर यांचे गोविंदा यांच्याबद्दल वक्तव्य, म्हणाले, “इतक्या वर्षांत…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
Tejashri Pradhan First Post Share after exit premachi goshta serial
“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “तुमची कुवत…”
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप

हेही वाचा…वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता

हा रील प्रचंड चर्चेत आला असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या. जान्हवी आणि खुशीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरने त्यांच्या वडिलांच्या मजेशीर कॅमिओचे कौतुक करत लिहिले, “बेस्ट अलाप एव्हर!!!” अभिनेता वरुण धवनने हसण्याचा इमोजी पोस्ट केला. चाहत्यांनीही “बोनीजी इज द मैन कॅरेक्टर!” अशा कमेंट्स करत आपलं प्रेम व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, जुनैद खानने याआधी ‘महाराज’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातून पत्रकाराच्या गंभीर भूमिकेत पदार्पण केले होते. मात्र, ‘लव्हयाप्पा हो गया’ या गाण्यात तो एकदम वेगळ्या अवतारात दिसत आहे. रंगीत पोशाख परिधान करून, जुनैद आणि खुशी हे गाण्यात तरुण प्रेमींच्या दृश्यांत दिसतात. या गाण्याचे मजेशीर आणि रिलेटेबल शब्दसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

हेही वाचा…अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”

‘लव्हयाप्पा’ चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच आमिर खानने ANI शी बोलताना ‘लव्हयाप्पा’बद्दल आपली प्रतिक्रिया दिली. त्याने चित्रपटाला ‘मनोरंजक’ असे म्हटले. आमिर म्हणाला, “मला हा चित्रपट आवडला, तो खूप मनोरंजक आहे. मोबाईल फोनमुळे आपल्या आयुष्यात ज्या मजेशीर गोष्टी घडतात, त्या या चित्रपटात दाखवल्या आहेत. सर्व अभिनेत्यांनी चांगले काम केले आहे.”

Story img Loader