Nadaaniyan Song Galatfehmi :  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर ( Khushi Kapoor ) आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान ( Ibrahim Ali Khan ) सध्या खूप चर्चेत आहेत. खुशी आणि इब्राहिमचा लवकरच ‘नादानियां’ नावाचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘गलतफेहमी’ असं नव्या गाण्याचं नाव असून सध्या ट्रेंड होतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नादानियां’ या चित्रपटातून सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो खुशी कपूरबरोबर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘नादानियां’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातील खुशी आणि इब्राहिमची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यानंतर आता ‘गलतफेहमी’ हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यातून पुन्हा एकदा खुशी आणि इब्राहिमची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांची प्रतिक्रिया…

‘नादानियां’ चित्रपटातील ‘गलतफेहमी’ हे गाण्यावर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे गाणं ऐकून खूप भारी वाटलं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप छान आहे. मी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “गाणं खूप छान आहे. मी सतत हे गाणं ऐकत आहे.”

खुशी कपूर, इब्राहिम अली खान कोणत्या भूमिकेत झळकणार?

दरम्यान, शौना गौतम यांना ‘नादानियां’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. धर्मा प्रोडक्शनच्या निर्मिती खाली हा चित्रपट तयार झाला आहे. या चित्रपटात खुशी कपूरने पिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तर इब्राहिम अली खानने एक कष्टाळू मुलाची भूमिका निभावली आहे. खुशी आणि इब्राहिमचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या दोन्ही गाण्यांमधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली आहे. आता चित्रपटाबाबत प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया येईल? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अद्याप ‘नादानियां’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे? हे समोर आलेलं नाही.