बॉलीवूड अभिनेत्री खुशी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या कामात व्यग्र आहे. लवकरच जुनैद खानबरोबर खुशी कपूर ‘लवयापा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे खुशी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. खुशीचं चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिनं नुकतीच प्लास्टिक सर्जरी केली आहे. तसेच तिनं आता तिच्या आयुष्यातील सुंदरतेविषयी बालपणीचे काही किस्से सांगितले आहेत.

खुशी कपूर नुकतीच ‘लवयापा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्क्रीन लाइव्हमध्ये आली होती. यावेळी मुलाखतीमध्ये तिनं सुंदरतेविषयी बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. लहान असताना तिला तिच्या दिसण्यावरून चिडवलं जात होतं. तसेच यामुळे तिच्या मनावर याचा काय परिणाम झाला. सौंदर्य वाढवण्यासाठी खरेपणानं आपल्या मनाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे, या सर्वांसंदर्भात खुशीनं तिचं मत मांडलं आहे.

Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
devmanus fame madhuri pawar shares old shocking incident
“माझ्या खांद्यावर हात टाकला…”, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, स्त्रियांच्या सुरक्षेबाबत म्हणाली…
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा सुरेश धस यांच्याकडून उल्लेख; म्हणाले, “आरोपी आकाच्या मुलाभोवती…”
Shivali Parab
“तेव्हा मी घाबरलेले…”, अभिनेत्री शिवाली परब प्रोस्थेटिक मेकअपचा अनुभव सांगत म्हणाली…

खुशीनं सांगितलं, “मी जेव्हा लहान होते, तेव्हा माझ्या दिसण्यावरून माझी खिल्ली उडवली जात होती. तू तुझ्या आई आणि बहिणीसारखी सुंदर नाही दिसत, असं म्हटलं जात होतं. हे अतिशय वाईट आहे. लहान असताना असं ऐकल्यानं माझा आत्मविश्वास कमी झाला होता.”

“मला वेगळं राहणं फार आवडायचं आणि मला नाही वाटत यात काही गैर आहे. लोक नेहमी मला हे कर, ते करू नको असं सांगत असतात. मीदेखील यातील मला योग्य वाटलेल्या गोष्टी फॉलो केल्या आहेत. स्किनकेअर या अशा गोष्टी नाहीत की, ज्यावर एखाद्या व्यक्तीविषयी फार जास्त चर्चा करावी.”

“माणसानं प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे. मी लहान असताना माझा लूक लोकांना आवडत नव्हता. मला विविध नावांनी चिडवलं जात होतं. आता मी लूक बदलला आहे; मात्र तरीही अनेक व्यक्ती यावरूनही टिप्पणी करतात. त्यामुळे तुम्ही तेच केले पाहिजे, जे तुम्हाला छान वाटेल,” असं खुशी म्हणाली.

काही दिवसांपूर्वी खुशीनं आपल्या नाकाची आणि ओठांची प्लास्टिक सर्जरी केली. तिनं ही सर्जरी केल्यावर ते मान्यही केलं. तसेच ‘कर्ली टेल्स’ला याबद्दल मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं सांगितलं, “प्लास्टिक सर्जरी करणं ही फार मोठी गोष्टी आहे, असं मला वाटत नाही. लोक प्लास्टिक या शब्दाला अवमानकारक सजतात आणि आपण सर्जरी केल्याचं मान्य करीत नाहीत. एखादी व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अशी सर्जरी करत असेल, तर त्यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही.”

Story img Loader