बॉलीवूड अभिनेत्री खुशी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या कामात व्यग्र आहे. लवकरच जुनैद खानबरोबर खुशी कपूर ‘लवयापा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे खुशी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. खुशीचं चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिनं नुकतीच प्लास्टिक सर्जरी केली आहे. तसेच तिनं आता तिच्या आयुष्यातील सुंदरतेविषयी बालपणीचे काही किस्से सांगितले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खुशी कपूर नुकतीच ‘लवयापा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्क्रीन लाइव्हमध्ये आली होती. यावेळी मुलाखतीमध्ये तिनं सुंदरतेविषयी बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. लहान असताना तिला तिच्या दिसण्यावरून चिडवलं जात होतं. तसेच यामुळे तिच्या मनावर याचा काय परिणाम झाला. सौंदर्य वाढवण्यासाठी खरेपणानं आपल्या मनाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे, या सर्वांसंदर्भात खुशीनं तिचं मत मांडलं आहे.

खुशीनं सांगितलं, “मी जेव्हा लहान होते, तेव्हा माझ्या दिसण्यावरून माझी खिल्ली उडवली जात होती. तू तुझ्या आई आणि बहिणीसारखी सुंदर नाही दिसत, असं म्हटलं जात होतं. हे अतिशय वाईट आहे. लहान असताना असं ऐकल्यानं माझा आत्मविश्वास कमी झाला होता.”

“मला वेगळं राहणं फार आवडायचं आणि मला नाही वाटत यात काही गैर आहे. लोक नेहमी मला हे कर, ते करू नको असं सांगत असतात. मीदेखील यातील मला योग्य वाटलेल्या गोष्टी फॉलो केल्या आहेत. स्किनकेअर या अशा गोष्टी नाहीत की, ज्यावर एखाद्या व्यक्तीविषयी फार जास्त चर्चा करावी.”

“माणसानं प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे. मी लहान असताना माझा लूक लोकांना आवडत नव्हता. मला विविध नावांनी चिडवलं जात होतं. आता मी लूक बदलला आहे; मात्र तरीही अनेक व्यक्ती यावरूनही टिप्पणी करतात. त्यामुळे तुम्ही तेच केले पाहिजे, जे तुम्हाला छान वाटेल,” असं खुशी म्हणाली.

काही दिवसांपूर्वी खुशीनं आपल्या नाकाची आणि ओठांची प्लास्टिक सर्जरी केली. तिनं ही सर्जरी केल्यावर ते मान्यही केलं. तसेच ‘कर्ली टेल्स’ला याबद्दल मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं सांगितलं, “प्लास्टिक सर्जरी करणं ही फार मोठी गोष्टी आहे, असं मला वाटत नाही. लोक प्लास्टिक या शब्दाला अवमानकारक सजतात आणि आपण सर्जरी केल्याचं मान्य करीत नाहीत. एखादी व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अशी सर्जरी करत असेल, तर त्यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही.”