बॉलिवूड सेलिब्रिटी जिथे जिथे जातात तिथे मीडिया आणि त्यांचे कॅमेरे आधीच पोहोचलेले असतात. काही सेलिब्रिटी मीडियाबरोबर उत्तम रिलेशन ठेवून असतात तर काहींना हा प्रकार अजिबात आवडत नाही. कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींनी बऱ्याचदा मीडियासमोर त्यांचा राग व्यक्त केला आहे. सध्या प्रत्येकाच्याच हातात मोबाइल असल्याने सगळेच सेलिब्रिटी दिसले की त्यांची झलक आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी धावतात. काही वेळा सेलिब्रिटी त्यांना फोटो काढू देतात तर काही वेळा ते लोकांवर चिडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असाच काही किस्सा अभिनेत्री कियारा अडवाणी बरोबर घडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका चित्रपटाच्या स्क्रीनींगमधून बाहेर पडताना फोटोसाठी तिला फॉलो करणाऱ्या लोकांवर कियारा चांगलीच भडकली आहे. सिद्धार्थ मल्होत्राशी कियारा लवकरच लग्न करणार असल्याची बातमी बाहेर आल्याने सध्या सगळेच कियाराच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंडबद्दल रकुल प्रीत सिंगने व्यक्त केली चिंता; म्हणाली “यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी…”

एका चित्रपाटाच्या सक्रीनींगमधून बाहेर पडताना कियाराच्या भोवती तिचे चाहते आणि मीडिया यांनी घोळका केला. तिथून बाहेर पडत असताना काही लोकांनी रस्त्यात येऊन कियाराचे फोटो काढायचा प्रयत्न केला. यावर कियारा चांगलीच भडकली. “समोर ज्येष्ठ नागरिक आहेत, जरा बघा तरी आपण कुठे आहोत काय करतोय याचं भान ठेवा.” असं म्हणत कियाराने त्यांना विनंती केली. तिथून बाहेर पडताना सगळ्यांनी कियाराभोवती घोळका केल्याने तिथून बाहेर पडणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांना त्रास होताना दिसत होता. त्यामुळेच कियारा चिडली असल्याचं स्पष्ट होत आहे.

सध्या कियारा सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगत आहे. ‘भूलभुलैया २’ च्या घवघवीत यशानंतर कियारा पुन्हा कार्तिक आर्यनबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.