बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. शेरशाह चित्रपटापासून दोघेही एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. लग्नानंतर कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कियारा, अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला दिल्लीत; सेटवरचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर लीक

सध्या कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दोघांनीही अलीकडेच ‘मिरची प्लस’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अभिनेत्रीने प्रेम आणि लग्न याबाबत खुलासा केला. कियारा म्हणाली, “नुकतेच आमचे लग्न झाले असून, माझे लव्ह मॅरिज झाले आहे. त्यामुळे खऱ्या प्रेमावर माझा प्रचंड विश्वास आहे. मी नशीबवान आहे म्हणून मला त्याच्यासारखा नवरा मिळाला. माझा नवरा सिद्धार्थ, माझा खूप चांगला मित्र आहे. अगदी खरं सांगायचे झाले तर ‘मेरे लिए वही मेरा घर हैं…'”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब कॉफी पार्टनरच्या शोधात, अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

कियारा अडवाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने “कियारा कोणत्याही मुलाखतीला गेली तरी आवर्जून नवऱ्याविषयी सांगते” अशी कमेंट या व्हायरल व्हिडीओवर केली आहे.

हेही वाचा : “आदिपुरुषमुळे सनातन धर्माच्या…” AICWA चे गृहमंत्री अमित शाहांना पत्र, निर्मात्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी

दरम्यान, ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केले आहे. यामध्ये कार्तिक ‘सत्यप्रेम’, तर कियारा ‘कथा’ची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiara advani blushes as she opens up about her marriage with sidharth malhotra sva 00