अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीशी ७ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. दोघांनी जैसरलमेर, राजस्थान येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये आपले कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नाचे फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण त्यांच्या लग्नाआधीच्या फंक्शनचे व्हिडीओ आणि फोटोही समोर आलेले नाहीत. मात्र आता कियाराचा भाऊ मिशाल अडवाणीने मात्र संगीत नाइटचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

कियाराच्या भावाने संगीत नाइटचा व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या बहिणीला खास गिफ्ट देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मिशाल स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानेही मनिष मल्होत्राने डिझाइन केलेले ब्लॅक कलरचे आउटफिट्स परिधान केले आहेत. तर या संगीत नाइटसाठी केलेलं लाइट्सचं सुंदर डेकोरेशनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ आणि कियारा दिसत नाहीत.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
aishwarya rai with mother daughter aaradhya video viral
Video : ऐश्वर्या राय बच्चनचा आई अन् लेकीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या…”
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं

आणखी वाचा- करण जोहर भारी दिलदार! निर्मात्याने सिद्धार्थ-कियाराला दिलं लग्नाचं ‘हे’ मोठं गिफ्ट

मिशाल अडवाणीने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “तेरी आंखों से याद आया मेरी बातों में प्यार” या त्याच गाण्याच्या ओळी आहेत जे गाणं तो गात आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना कियारा अडवाणीने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. याशिवाय अनेक युजर्सनी कियाराच्या आयुष्यातील खास दिवशी मिशालच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- सुजलेले ओठ, चेहरा अन्…; रुबीना दिलैकला नक्की झालंय तरी काय? फोटो व्हायरल

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराने ७ फेब्रुवारीला लग्न केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघंही पती-पत्नीच्या रुपात जैसलमेर विमानतळावर दिसले होते. जैसलमेरमधून ते दिल्लीला गेले. दिल्लीला मल्होत्रा कुटुंबियांनी दोघांचं शानदार पद्धतीने स्वागत केलं. १० फेब्रुवारीला या दोघांनी दिल्ली येथे रिसेप्शन पार्टी ठेवली होती. त्यानंतर आता मुंबईमध्येही रिसेप्शन पार्टी दिली जाणार असून त्याची तयारी सुरू आहे.

Story img Loader