बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’मध्ये कियाराबरोबर अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या हे दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “बॉक्स ऑफिस कमाई खोटी” ‘आदिपुरुष’च्या कलेक्शनवर प्रसिद्ध अभिनेत्याने नोंदवला आक्षेप, म्हणाले “लोकांना मूर्ख…”

अलीकडेच अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमाच्या सेटवर पोहोचली होती. यावेळी व्हॅनिटी व्हॅनमध्ये जात असताना पापाराझींनी तिला अडवले आणि कियाराला प्रश्न विचारला, “कियाराजी हमारे भाई सिद्धार्थ मल्होत्रा कैसे है?” परंतु, तेव्हा अभिनेत्रीचे पापाराझींकडे लक्ष नव्हते त्यानंतर एका फोटोग्राफरने पुन्हा एकदा “हमारे जीजू कैसे है, भाई कैसे है?” असा प्रश्न मोठ्याने अभिनेत्रीला विचारला. यावर कियाराने फारच मजेशीर उत्तर दिले आहे.

हेही वाचा : “श्रीमंतांची पार्टी, ढोंगी मित्र अन्…” ‘नीयत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेत्री विद्या बालन करणार खूनाचा तपास

पापाराझींनी विचारलेला प्रश्न ऐकून कियारा काहिशी लाजली. तिने प्रथम हातवारे करून “मस्त” असे सांगितले त्यानंतर ती म्हणाली, “टकाटक है” पुढे पापाराझींना “चलो…” म्हणून कियारा आपल्या व्हॅनिटीमध्ये निघून गेली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केले आहे. यामध्ये कार्तिक ‘सत्यप्रेम’, तर कियारा ‘कथा’ची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiara advani looking shy when paparazzi ask jiju kaise hai sva 00