कियारा अडवाणी(Kiara Advani) व सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. त्यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत ते आई-वडील होणार असल्याचे चाहत्यांबरोबर शेअर केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. हे जोडपे चांगलेच चर्चेत आले होते. आता या सगळ्यात अभिनेत्री कियारा अडवाणीने एका कार्यक्रमात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर(Kareena Kapoor Khan) खानबद्दल केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
कियारा अडवाणी म्हणालेली…
२०१९ साली कियारा अडवाणीची प्रमुख भूमिका असलेला गुड न्यूज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कियाराला काही प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न तिच्या भविष्यातील अपत्याविषयी होते. त्याची कियाराने उत्तरे देत प्रेक्षकांची मने जिंकली होती. अपत्य हे सृदृढ असावे, निरोगी असावे यावर भर देण्यात आला होता आणि जर तिला मुलगी झाली, तर तिला तिच्यामध्ये करीना कपूरमधील कोणती गुणवैशिष्ट्ये असायला हवीत यावरही तिने वक्तव्य केले होते. तिला करीना कपूरमधील कोणती गुणवैशिष्ट्ये तिच्या मुलीत पाहायला आवडतील, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना कियाराने, “तिचा आत्मविश्वास, प्रतिभा, हावभाव”, असे उत्तर दिले होते. गुड न्यूज या चित्रपटात कियारा अडवाणीबरोबरच दिलजीत दोसांज, कियारा अडवाणी, करीना कपूर खान, अक्षय कुमार हे प्रमुख भूमिकांत दिसले होते.
कियारा अडवाणीने काही दिवसांपूर्वीच तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर लहान बाळाच्या मोज्यांचा एक फोटो शेअर केला. हे मोजे कियारा आणि सिद्धार्थच्या तळहातात असल्याचे दिसले. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे.” अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केले. या जोडप्याने शेरशाह या चित्रपटात काम केले आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या गाजलेल्या चित्रपटातून या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
कियारा अडवाणी टॉक्सिक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अभिनेत्री वॉर २ या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांच्याबरोबर दिसणार आहे. याबरोबरच सिद्धार्थ मल्होत्रा परम सुंदरी या चित्रपटात जान्हवी कपूरबरोबर दिसणार आहे.