कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांचंही ७ फेब्रुवारीला लग्न आहे. त्यांचं लग्न राजस्थानमधील जैसलमेरमध्ये होणार आहे. या लग्नासाठी दोघेही जैसलमेर पोहोचले आहेत. कियारा मुंबईतून जैसलमेरला जाण्यासाठी निघाली तेव्हा तिने गुलाबी रंगाचा स्कार्फ घेतला होता.

मुंबईत घर, गाड्या अन्…; कियारा अडवाणीपेक्षा तिप्पट श्रीमंत आहे सिद्धार्थ मल्होत्रा, जाणून घ्या दोघांच्या संपत्तीबद्दल

जैसलमेरला जाताना कियारा एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. तसेच त्यावर गुलाबी रंगाचा स्कार्फ घेतला होता. यावेळी तिच्याबरोबर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राही होता. कियाराने यावेळी घेतलेल्या गुलाबी स्कार्फची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. कियाराचा हा स्कार्फ तुम्हाला स्वस्त वाटत असेल पण तो स्वस्त नाही.

कियाराने लक्झरी ब्रँड हर्मीसचा स्कार्फ घेतला होता. या स्कार्फची किंमत १,०५० डॉलर्स आहे. भारतीय पैशांमध्ये त्याची किंमत अंदाजे ८६,००० रुपये आहे, असं वृत्त टाइम्स नाऊने दिलंय.

kiara advani scarf
(फोटो – स्क्रिनशॉट)

दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थचे आज संगीत असून उद्या त्यांचं लग्न होणार आहे. कियारा लग्नात मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा परिधान करणार आहे. त्यांच्या लग्नानिमित्त जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेस सजला असून पाहुणे देखील जैसलमेरला पोहोचत आहेत.

Story img Loader