बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कियारा अभिनेता कार्तिक आर्य़नबरोबर झळकणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कियाराचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- अलिशान बंगला अन्….करिश्मा कपूरने घटस्फोट घेताना नवऱ्याकडून पोटगीत काय काय घेतले होते?

शनिवारी कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरला पोहोचले होते. जयपूरमध्ये ते एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या क्रार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत कियाराचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. मात्र, अभिनेत्रीने याबाबत अद्याप कोणताही खुलासा केला नाही.

कियाराच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणत कमेंट करत आहेत. एका यूजरने विचारले, ‘कियारा प्रेग्नंट आहे का?’ तर आणखी एकाने सिद्धार्थला सांगावे लागेल अशी मजेशीर कमेंट केली आहे. कियाराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर तिचा आणि कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केले आहे. यामध्ये कार्तिक ‘सत्यप्रेम’, तर कियारा ‘कथा’ची भूमिका साकारणार आहे.