बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. कियाराने आतापर्यंत जे चित्रपट केले आहेत ते सर्व हिट ठरले आहेत. कियाराने अलीकडेच खुलासा केला की तिने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कियाराने नेमकी कोणत्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली हे तिने सांगितलं नसलं तरी याबद्दलची तिने आठवण नुकतीच शेअर केली आहे. ‘फिल्म कंपेनियन’शी संवाद साधताना कियाराने यासाठी ऑडिशन दिल्याचं सांगितलं. अर्थात तेव्हा ही ऑडिशन नेमकी कोणत्या चित्रपटासाठी घेतली जात आहे याची माहिती तिलाही तेव्हा नव्हती.

आणखी वाचा : “मी गरोदर…” लग्नाबद्दल विचारपुस करणाऱ्या चाहत्याला तापसी पन्नूने दिलं भन्नाट उत्तर

या मुलाखतीमध्ये कियाराला स्वतःची ती ऑडिशन अजिबात आवडलं नसल्याचं तिने सांगितलं. ती ऑडिशन पुन्हा बघू शकत नाही असंही कियारा या मुलाखतीमध्ये म्हणाली. त्यात तिचा परफॉर्मेंस चांगला नव्हता असं तिचं म्हणणं आहे. याच मुलाखतीमध्ये कियाराने ऑडिशन देणं एका कलाकारासाठी फार महत्वाचं असतं असंही तिने सांगितलं.

‘सत्यप्रेम की कथा’ हा सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर लवकरच कियारा राम चरणबरोबर ‘गेम चेंजर’ या चित्रपटात झळकणार आहे. इतकंच नव्हे तर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा ऐवजी कियारा अडवाणी दिसू शकते अशी चर्चा आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.