अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याचा विमानतळावरील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत कियारा तिचे पोट लपवताना दिसत आहे. ज्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. ५,६ आणि ७ फेब्रुवारी असे तीन दिवस अगदी शाही थाटात हा सभारंभ पार पडला. त्यांनी ५ फेब्रुवारीला मेहंदी, ६ फेब्रुवारीला संगीत समारंभाचे आयोजन केले होते. त्यानंतर ७ फेब्रुवारीला सकाळी त्यांचा हळदीचा सभारंभ संपन्न झाला आणि त्याच दिवशी दुपारी ते दोघं बोहल्यावर चढले.
आणखी वाचा : Photos : “कायमस्वरुपी बुकींग झालंय…” सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या लग्नाचे फोटो अखेर समोर, पाहा शाही थाट
यावेळी कियाराने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला होता. तर सिद्धार्थने सोनेरी रंगाची डिझायनर शेरवानी परिधान केली होती. सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळ्याला विविध बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ आणि कियारा दिल्लीतील त्यांच्या घरी दाखल झाले. यावेळी त्यांचे जैसलमेर विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
या व्हिडीओत कियाराने काळ्या रंगाचा एक सूट परिधान केला होता. त्याबरोबर तिच्या हातात चुडा, भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्रही पाहायला मिळत होते. यावेळी कियाराने एक शाल गुंडाळली होती. याद्वारे ती तिचे पोट झाकण्याचा प्रयत्न करत होते. पण यावरुन अनेकांनी तिच्याबद्दल विविध तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. कियाराने कॅमेऱ्यासमोर पोट लपवल्याने अनेकांनी कमेंट करत ती गरोदर असल्याचे म्हटलं आहे.
आणखी वाचा : Photos : कियारा अडवाणीच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, डिझाईनची सोशल मीडियावर चर्चा
त्यांच्या या व्हिडीओवर एक जण कमेंट करत म्हणाला की, “मला नक्कीच खात्री आहे की, येत्या दोन तीन महिन्यात यांच्याकडूनही गुडन्यूज येणार आहे. ही जिकडे जाते तिकडे पोट लपवत असते. लोकांना वेड्यात का काढताय?” तर एकाने “आलियाप्रमाणे ही देखील गरोदर आहे”, असे म्हटले आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे या अफवा असल्याचे बोललं जात आहे.