बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. या दोघांनाही पार्टी, सार्वजनिक ठिकाणी अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. आता कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याचं समोर आलं होतं. आता त्यांना ते ठिकाण मिळालं असून ते लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. कियाराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने २ डिसेंबरचा उल्लेख केल्यामुळे २ डिसेंबरला ती त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली, “तो मला…”

कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत ती खूप आनंदात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने लिहिलं, “गुपित अजून ताणून धरू शकत नाही. २ डिसेंबरची वाट पहा.” कियाराचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत तिचे चाहते आतासूनच त्यांना शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा : “आधीच्या रिलेशनशिपमधून मी एक महत्वाची गोष्ट शिकलो की…” सिद्धार्थ मल्होत्राने केला मोठा खुलासा

कियारा आणि सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं गेले अनेक दिवस बोललं जात होतं. ‘कॉफी विथ करण’च्या एपिसोडमध्ये शाहिद कपूरनीही त्यांच्या लग्नाची हिंट दिली होती. तो म्हणाला होता की, “या वर्षाच्या अखेरीस एका मोठ्या घोषणासाठी तयार राहा आणि ही घोषणा कुठल्याही चित्रपटाची नाही.” त्यामुळे कियारा सिद्धार्थ आणि तिच्या लग्नाची तारीख जाहीर करणार का? आणि केलीच तर ती काय असेल, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत.

Story img Loader