बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ५ किंवा ६ फेब्रुवारीदरम्यान कियारा व सिद्धार्थ जैसलमेरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. या दोघांच्या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे. तर कियाराही तिच्या कुटुंबियांसह जैसलमेरला जाण्यासाठी रवाना झाली आहे.
कियारा व तिच्या कुटुंबियांना पापाराझी छायाचित्रकारांनी मुंबई विमानतळावर गाठलं. यावेळी कियाराने फोटोसाठी पोझ दिली. तसेच लग्नापूर्वी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो पाहायला मिळाला. शिवाय जैसलमेरमध्येही या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर कियारा व सिद्धार्थ लग्न करणार आहेत.
या दोघांच्या लग्नामध्ये सगळं काही खास आहे. लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवाय संगीत कार्यक्रमापासून ते मेहंदी कार्यक्रमापर्यंत सगळं काही ठरलं आहे. संगीत कार्यक्रमामध्ये बॉलिवूडची काही गाणी असतील. तर सुप्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा कियाराच्या हातावर मेहंदी काढणार आहेत.
सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला कियारा-सिद्धार्थने बुक केला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे. शिवाय आता कंगना रणौतनेही या दोघांसाठी गोड जोडपं म्हणून पोस्ट शेअर केली आहे. कियारा-सिद्धार्थच्या लग्नाला अमिताभ बच्चन ते शाहरुख खानपर्यंतचे सगळे दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.