अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्या दोघांनी मुंबईतील मित्र-परिवार आणि कुटुंबासाठी एका रिसेप्शनचेही आयोजन केले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी कियाराने लग्नाच्या मांडवात तिला काय वाटत होते, याबद्दलचा खुलासा केला.

नुकतंच सिद्धार्थ आणि कियारा यांनी एका पुरस्कार सोहळ्याला एकत्र हजेरी लावली. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघेही एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. यावेळी कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कियारा ही मंचावर पुरस्कार स्विकारत सिद्धार्थबद्दल बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : Video : मुलगा असावा तर असा…! मुंबईच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये सिद्धार्थच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

यात कार्यक्रमाचा होस्ट मनीष पॉल हा कियाराला लग्नाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. ‘तू लग्नमंडपात जाण्याआधी तुला एक नववधू म्हणून काय वाटत होते?’ असे मनीष पॉल तिला विचारतो. यावर ती म्हणते, “मी त्याक्षणी फार भावूक झाले होते. पण जेव्हा दरवाजा उघडला आणि मी सिद्धार्थ पाहिले, त्यावेळी मला मनातून अखेर मी लग्न करतेय ही भावना जागी झाली. त्याच भावनेने मी पुढे निघाले. मी ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करते, त्याच्याशीच माझे लग्न होत आहे. याचा माझ्या मनात आनंद होता”, असे तिने म्हटले.

कियाराने असं म्हटल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा हा मंचावर आला आणि त्याने तिला मिठी मारली. त्यानंतर ते दोघेही मंचावरुन खाली उतरत जागेवर जाऊन बसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : Sidharth-Kiara Wedding: कियाराच्या मंगळसूत्राची किंमत माहितीये का? सिद्धार्थने खर्च केले तब्बल…

दरम्यान बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले होते.

Story img Loader