बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘सत्यप्रेम की कथा’ २९ जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे कार्तिक-कियारा सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. अलीकडेच या चित्रपटातील रिलीज झालेल्या काही गाण्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी २’चा प्रोमो झाला प्रदर्शित; यंदा प्रेक्षक असणार स्पर्धकांचे ‘बॉस’, केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

कियारा आणि कार्तिकने नुकताच त्यांच्या चित्रपटातील “आज के बाद तू मेरी रहना” या गाण्यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. चित्रपटातील फोटोमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकलेले दिसत आहेत, परंतु हा फोटो शेअर करणे कियाराच्या चाहत्यांना फारसे आवडले नाही आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक युजर्सनी “सिद्धार्थ आणि तुझ्या खऱ्या लग्नातील पोज तुम्ही चित्रपटात जशीच्या तशी का रिक्रिएट केली?” असे प्रश्न अभिनेत्रीला कमेंट्समध्ये विचारण्यास सुरुवात केली. या सगळ्या गोंधळानंतर कियारा अडवाणीने इन्स्टाग्रामवरून कार्तिक आर्यनबरोबरचा लग्नबंधनात अडकलेला चित्रपटातील फोटो डिलीट केला.

हेही वाचा : “तुझ्याकडे काय आहे जे इतर अभिनेत्यांकडे नाही?” फिल्मी स्टाईल उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, “मेरे पास…”

कार्तिक आर्यनच्या इन्स्टाग्राम पेजवर अजूनही हा फोटो दिसत आहे. त्याच्या पोस्टवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “मी सिद्धार्थ मल्होत्रा असतो, तर हे सहन केले नसते.” दुसऱ्या एका युजरने आम्हाला “कियाराने सिद्दार्थबरोबर घटस्फोट कधी घेतला?” असा प्रश्न विचारला आहे. नेटकऱ्यांच्या अशाप्रकारच्या प्रतिक्रिया पाहूनच कियाराने पोस्ट डिलीट केल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत.

हेही वाचा : “तू सिगारेट सोडलीस का?” शाहरुख खानने दिलेले उत्तर पाहून चाहते चक्रावले, म्हणाले “जरा काळजी…”

‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट यावर्षी २९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, पण काही कारणास्तव यात बदल करुन ‘सत्यप्रेम की कथा’ असे नाव ठेवण्यात आले. कार्तिक-कियारासह या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiara advani wedding pose with kartik aaryan sparks new controversy actress delete post from instagram sva 00