बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाह बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांची लगीन घाटिका समीप आली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत. आता अशातच कियाराचा ब्रायडल लूकमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न होत आहे. परवा यांच्या लग्नाची मेहंदी, काल हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर आज संध्याकाळी ही दोघं बोहल्यावर चढणार आहेत. आता त्यांचं लग्न लागायच्या आधीच कियारा अडवाणीचा ब्रायडल लूकमधील एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Who is PV Sindhu Husband Venkat Datta Sai Education IPL Delhi Capitals Wedding
PV Sindhu Wedding: कोण आहे पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई? आयटी व्यावसायिक ते ‘या’ IPL संघाशी आहे कनेक्शन
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
pv sindhu wedding first picture Indian Badminton Star Tied Knot with Venkat Datta Sai
PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
Marathi actress Shivani sonar will wear panaji nath in wedding
Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
lagira zala ji fame mahesh jadhav purva shinde rahul magdum played banjo in Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding
Video: किरण-वैष्णवीच्या सप्तपदीला ‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांनी वाजवला बँन्जो, पाहा व्हिडीओ
Devmanus Fame Kiran Gaikwad wedding Amarnath Kharade Nikhil Chavan Sumeet pusavale Mahesh Jadhav dance in varat
Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वरातीत मराठी कलाकारांचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर
actor Shalva Kinjawadekar first Wedding Photo out
‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर अडकला लग्नबंधनात, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला लग्नातील पहिला फोटो

आणखी वाचा : लग्नानंतर नवीन वास्तूत राहायला जाणार सिद्धार्थ-कियारा, घराची किंमत वाचून व्हाल आवाक्

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कियारा लाल रंगाचा घागरा घालून नव्या नवरीसारखी नटलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी गोंधळून गेले. अनेकांना हा व्हिडीओ सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा असल्याचं वाटलं. परंतु हा व्हिडीओ कियाराच्या एका जाहिराती दरम्यानचा आहे. आता या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांच्या लग्नाचे फोटो कधी पाहायला मिळणार असा प्रश्न विचारत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी कियाराच्या लूकचंही कौतुक केलं.

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराच्या शाही विवाह सोहळ्याचा थाटच भारी; सूर्यगढ पॅलेसमधील खोलीचं एका दिवसाचं भाडं तब्बल…

दरम्यान आज दुपारी २ ते ४ दरम्यान ही दोघं विवाहबद्ध होतील. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आनंद घेता यावा यासाठी राजस्थानी नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे.

Story img Loader