भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. अशातच सोशल मीडिया स्टार किली पॉलच्या एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे. टांझानियाचा रील स्टार किली पॉल अनेक हिंदी गाण्यावर व्हिडीओ बनवतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किली पॉलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल त्याच्या बहिणीसह ‘नोट छापने की मशीन’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. किली पॉलच्या या व्हिडीओचा संदर्भ नेटकऱ्यांनी भारतातील नोटबंदीशी जोडला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

“भारतात २०००ची नोट बंद झाली आहे. आता मशीन घेऊन काय करणार?” अशी कमेंट केली आहे. “२००० घे,” असंही एकाने म्हटलं आहे.

“भारतात दोन हजारांच्या नोटा बंद झाल्या आहेत. सप्टेंबर शेवटचा महिना आहे,” अशी मजेशीर कमेंटही एकाने केली आहे. किली पॉलचा हा व्हिडीओ चर्चेत असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kili paul dance on note chapane ki machine after rbi decision 2000rs netizens react kak