बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत काही ना काही कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच राखीला लॉरेन्स बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खान धमकी प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा राखी सावंतला देण्यात आला होता. दरम्यान आता पुन्हा राखीने प्रकरणावर बिंदास्तपणे भाष्य केलं आहे. राखीने लॉरेन्स बिश्नोईला थेट आव्हान दिले आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- शाहरुख खानने सुप्रसिद्ध मॉडलेला ‘मन्नत’मध्ये जेवणासाठी केलं आमंत्रित; किंग खानने स्वत: बनवला ‘हा’ पदार्थ

व्हिडीओमध्ये राखी सलमान खान आणि तिला मिळालेल्या धमकीवर भाष्य करताना दिसत आहे. राखी म्हणाली. आज ईदच्या दिवशी स्पष्टपणे बोलत आहे. माझ्या भावाला हात लावू नका. भावाच्या बहिणीच्या हत्येने तुमचं पोट भरत असेल, तुम्हाला शांती मिळेल तर माझा जीव घ्या .. नक्कीच मी सलमान खानची बहीण राखी सावंत आहे. माझा हत्येचा गुन्हाही तुमच्या डोक्यावर येणार नाही. जा.. अल्लाह-हू-अकबर.’

याआधी, मार्चमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून ही धमकी देण्यात आली होती. तेव्हा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून मिळालेल्या धमकीवर राखी सावंत म्हणाली होती की, सलमान खान हा एक दिग्गज अभिनेता आहे. त्याच्याबद्दल कुणीही वाईट विचार करू नये. सलमान खानऐवजी मी तुमची माफी मागते, असं राखी सावंत प्रसारमाध्यमांसमोर बोलली होती.

हेही वाचा- Video : कतरिना कैफबद्दल प्रश्न विचारताच आलियाने फिरवलेलं तोंड; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले..

गेल्या महिन्यात ज्या व्यक्तीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचं नाव ‘रॉकी भाई’ असं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित आरोपी राजस्थानातील जोधपूर येथील रहिवाशी असल्याचं निष्पन्न झालं. “आपण गोरक्षक आहोत” असा दावा आरोपीनं केला आहे. विशेष म्हणजे सतत जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने सलमान खानने बुलेट प्रूफ गाडी खरेदी केली आहे. ही गाडी दुबईवरून आयात करण्यात आली असून याचं अद्याप भारतात लाँचिंग करण्यात आलं नाही. निसान कंपनीची ही गाडी सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे.