Kim Kardashian On Ambani Family: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलै २०२४ मध्ये झाले. त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून पाहुणे मुंबईत आले होते. बॉलीवूड स्टार्स, राजकीय नेते, उद्योगविश्वातील दिग्गज व हॉलीवूडची रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन, तिची बहीण ख्लोए कार्दशियन यांनी या भव्यदिव्य लग्नात हजेरी लावली होती.

अनंत व राधिकाच्या लग्नात कार्दशियन सिस्टर्सची खूप चर्चा झाली होती. त्यांनी अनंत व राधिकाच्या लग्नात खूप एन्जॉय केले होते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले होते, पण आता किमने तिच्या शो ‘द कार्दशियन्स’मध्ये खुलासा केला आहे की ती अंबानी कुटुंबाला ओळखत नव्हती.

किमचा मुंबईतील ४८ तासांचा प्रवास तिचा शो ‘द कार्दशियन्स’च्या ताज्या भागात दाखवण्यात आला आहे. तसेच एपिसोडमध्ये, किमने कबूल केलं की ती अंबानी कुटुंबाला ओळखत नाही, पण तरीही ती अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास करून आली होती. “मी अंबानी कुटुंबाला खरंच ओळखत नाही. पण आमचे काही कॉमन मित्र आहेत,” असं किम म्हणाली.

अंबानी कुटुंबाबद्दल कार्दशियन सिस्टर्सना कोणी सांगितलं?

किमने सांगितलं की ज्वेलरी डिझायनर लॉरेन श्वार्ट्ज अंबानी कुटुंबासाठी दागिने डिझाइन करते. अंबानींनी लॉरेनला म्हटलं होतं की त्यांना कार्दशियन कुटुंबाला अनंत व राधिकाच्या लग्नासाठी निमंत्रित करायचं आहे. किम म्हणाली, “लॉरेन श्वार्ट्ज आमच्या चांगल्या मैत्रिणींपैकी एक आहे, ती एक ज्वेलर आहे. ती अंबानी कुटुंबासाठी दागिने बनवते. तिने मला सांगितलं की ती लग्नाला जात आहे आणि अंबानी कुटुंबाला तुम्हाला आमंत्रित करायचं आहे. त्यावर आम्ही फक्त ‘हो’ म्हणालो.”

…अन् वाटलं आम्ही नाही म्हणू शकत नाही

किम आणि ख्लोए यांनी अंबानी कुटुंबाकडून मिळालेल्या लग्नाच्या निमंत्रणाबद्दल माहिती दिली. त्या इनव्हाइटचे वजन तब्बल ४०-५० पौंड (१८-२२ किलो) होते, असं त्यांनी सांगितलं. “आम्हाला मिळालेले इनव्हाइट ४०-५० पौंड वजनाचे होते आणि त्यातून संगीत येत होते,” असं ख्लोए म्हणाली. “ते इनव्हाइट खूप छान होतं त्यामुळे अशा गोष्टीला आम्ही नाही म्हणू शकत नाही, असं वाटलं,” असं तिने सांगितलं.

जामनगरमध्ये झालेला प्री-वेडिंग सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा मार्च २०२४ मध्ये जामनगरमध्ये झाला होता. जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रिहानाने परफॉर्म केले. तसेच तिन्ही खान म्हणजेच शाहरुख, सलमान आणि आमिरही स्टेजवर एकत्र दिसले होते. दिलजीत दोसांझ आणि अॅकॉन यांनीही पाहुण्यांसाठी परफॉर्म केले. जामनगरनंतर जुलैमध्ये जस्टिन बीबर अनंत राधिकाच्या लग्नात पाहुण्यांचं मनोरंजन केलं होतं.

Story img Loader