आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव सध्या तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. अशात किरण रावने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या अपयशावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिर खान व करीना कपूर अभिनीत ‘लाल सिंग चड्ढा’ २०२२ साली प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपटात फ्लॉप झाला. ६० कोटींची कमाई ‘लाल सिंग चड्ढा’ने केली होती. या चित्रपटाच्या अपयशाचा परिणाम आमिर खानवर झाला होता.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याबरोबरचं ८ वर्षांचं नातं मोडल्यानंतर पल्लवी सुभाष कशी पडली यातून बाहेर, म्हणाली, “एखाद्याबरोबर असलेलं…”

नुकतीच किरण रावने ‘झूम’ एंटरटेनमेंट चॅनेलला मुलाखती दिली. यावेळी ती ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलली. किरण म्हणाली, “‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप होणं हे खरंच निराशाजनक होतो. जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करता आणि तरीही काम होत नाही, तसंच काहीस ‘लाल सिंग चड्ढा’बरोबर झालं. या चित्रपटाच्या अपयशाचा परिणाम आमिरवर खूप जास्त झाला. एवढंच नाहीतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर परिणाम झाला.”

पुढे किरण राव म्हणाली, “आमिरसाठी ‘लाल सिंग चड्ढा’ ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे हक्क मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. या चित्रपटाला यश मिळण्यासाठी आमिरने प्रचंड काम केलं होतं. पण अखेर हा चित्रपट अपयशी ठरला. सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’बाबत सकारात्मक प्रतिक्रिया होत्या. मात्र, शेवटी मी आमिरला वस्तुस्थिती स्वीकारण्यास सांगितलं.”

हेही वाचा – २४ वर्षांच्या ‘या’ प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने खरेदी केला अक्षय कुमारचा फ्लॅट, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात आमिर, करीना व्यतिरिक्त मोना सिंह आणि नागा चैतन्य यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केलं होतं. हा चित्रपट टॉम हँक्सच्या १९९४ सालच्या ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran rao opens up about aamir khan disappointment over laal singh chaddha movie failure pps