जेव्हा किरण रावने व आमिर खानने डेटिंग करण्यास सुरुवात केली, तेव्हा किरणला टीकेचा सामना करावा लागला होता. आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्ताशी झालं होतं, किरणमुळे त्यांचा संसार मोडला, असं म्हटल जाऊ लागलं. ‘लगान’ प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभराने २००२ मध्ये आमिर व रीना विभक्त झाले. ‘लगान’ची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून किरणने आमिरसह काम केलं होतं. तिथूनच दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले आणि आमिरने रीनाला घटस्फोट दिल्याचं म्हटलं जात होतं. पण आता किरणने या गोष्टीत काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झूम’शी बोलताना किरण म्हणाली, “खूप लोकांना वाटतं की आमिर आणि मी ‘लगान’ चित्रपटावेळी भेटलो, पण तसं नाहीये. आम्ही ‘स्वदेस’च्या वेळी एकत्र आलो, त्यावेळी तो ‘मंगल पांडे’चे शूटिंग करणार होता. ‘लगान’ नंतर तीन-चार वर्षांनी आशुतोष गोवारीकरबरोबर आम्ही काही जाहिराती शूट केल्या होत्या आणि तिथेच आमिर आणि मी पुन्हा भेटलो. मधल्या काळात आम्ही संपर्कात नव्हतो. ‘लगान’बद्दल मी त्याच्याशी क्वचितच बोलले असेन. ‘लगान’च्या वेळी मी इतर कोणाला तरी डेट करत होते. जेव्हा मी आणि आमिर २००४ मध्ये बाहेर जाऊ लागलो, तेव्हा लोकांना वाटलं की ‘लगान’च्या शूटिंगपासून आम्ही एकत्र आहोत आणि त्यामुळेच आमिरचा घटस्फोट झाला. पण या गोष्टीत काहीही तथ्य नाही.”

“ती माझ्यावर ओरडते”, घटस्फोटानंतर किरण रावसह काम करण्याबाबत आमिर खान म्हणाला, “आम्ही एकत्र…”

आमिर आणि तिने त्यांच्या नात्यात स्पष्टता यावी यासाठी समुपदेशन घेतलं होतं, असं किरणने सांगितलं. “जेव्हा तुम्ही एखाद्याशी लग्न करता, जो आधी दुसऱ्या नात्यात होता, तेव्हा काही गोष्टी अशा असतात, ज्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होतो. त्यामुळे मी जोडप्यांना समुपेदशनाची शिफारस करते. आमिर आणि मीही समुपदेशन घेतलं होतं. यामुळे तुम्ही तुमच्या गरजांबद्दल बोलता, तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसे पाहता याबद्दल स्पष्टता येते. समुपदेशन माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरलं होतं. यानंतर काहीही झालं तरी आम्हा दोघांनाही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे, या मतावर मी आणि आमिर सहमत झालो,” असं किरण राव म्हणाली.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची लेक होणार जान्हवी कपूरची सासू? शिखर पहारियाच्या आईचं मराठी मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

किरण राव आणि आमिर खान २००५ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर १६ वर्षांनी २०२१ मध्ये ते विभक्त झाले. त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. आझादचे आई-वडील म्हणून किरण व आमिर एकत्र जबाबदाऱ्या पार पाडतात. किरणने दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran rao recalls dating days with aamir khan says everybody thought this caused divorce with reena datta hrc