बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान होय. आमिर खान सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चर्चांचा भाग बनतो. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानमुळे चर्चेत होता. आता त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावमुळे मोठ्या चर्चेत आला आहे.
किरण रावने फेय डिसूजा यांना मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान तिने आमिर खान आणि तिच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केले आहे. ती म्हणते, “मला वाटतं की, वेळोवेळी नात्यांना तपासून बघितलं पाहिजे, पुन्हा त्या नात्याला वेगळं नाव दिलं पाहिजे, कारण जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसे माणूस म्हणून आपण बदलतो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. मला त्यावेळी वाटलं की, हा घटस्फोट मला आनंदी राहण्यास मदत करेल आणि खरं सांगायचं तर मी खूप खूश आहे. हा खूप सुखद घटस्फोट आहे.”
किरण रावने काय म्हटले?
यावर पुढे बोलताना तिने म्हटले आहे की, जेव्हा आमिर खान तिच्या आयुष्यात नव्हता, तेव्हा खूप काळासाठी मी एकटी होते. त्यावेळी एकटेपणा वाटायचा, पण आता माझ्या आयुष्यात माझा मुलगा आजाद आहे, त्यामुळे मला एकटेपणा जाणवत नाही. मला वाटतं, एकटेपणा अशी गोष्ट आहे, ज्याची लोकांना चिंता असते. जेव्हा एखाद्याचा घटस्फोट होतो किंवा जोडीदार राहत नाही, तेव्हा एकटेपणाला लोक घाबरतात. पण, माझ्याबाबतीत असे झाले नाही. मला आमिरपासून वेगळे झाल्यानंतर एकटेपणा कधीच वाटला नाही. मला त्याच्या आणि माझ्या दोन्ही परिवारांकडून पाठिंबा मिळाला. त्यानंतर सगळ्या चांगल्याच गोष्टी घडल्या.
हेही वाचा: ठरलं तर मग : प्रतिमा जिवंत असल्याची सायलीला पटली खात्री! मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो
आमिर खानबरोबरच्या नात्याविषयी किरण राव म्हणते की, आमच्या नात्यात खूप सारे प्रेम आहे, खूप सन्मान आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आम्हाला एकमेकांमध्ये सापडतात, त्यामुळे मला त्याला गमावायचे नव्हते. आम्ही एकमेकांसाठी काय आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आमच्यातली जी भागीदारी आहे, ती घटस्फोटानंतरही काळाच्या कसोटीवर टिकेल. असा विश्वास किरण रावने व्यक्त केला आहे.
दरम्यान, घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव त्यांच्या मुलाचे सह-पालकत्व निभावत आहेत. घटस्फोटानंतरही त्यांच्यामध्ये असलेल्या मैत्रीची मोठी चर्चा होताना दिसते. आमिर खानने दोन लग्ने केली. त्याची पहिली पत्नी रीना दत्ता, तर दुसरी किरण राव होती. मात्र घटस्फोटानंतर त्यांच्यात खेळीमेळीचे नाते पाहायला मिळते.