अभिनेत्री किरण खेर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांच्या आईच्या भूमिका अत्यंत चोखपणे वठवल्या आहेत. २००० च्या दशकात आलेल्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आईच्या भूमिका साकारल्या आहेत. यात ‘हम तुम’, ‘वीर-ज़ारा’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या हिंदी सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमांसह किरण यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. किरण यांना २०२० मध्ये कर्करोगाचं निदान झालं आणि या आजाराशी लढा देताना त्यांना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं, याचे अनुभव त्यांनी शेअर केले आहेत.

अभिनेत्री किरण खेर यांना २०२० मध्ये कर्करोग झाला. त्यावेळचे आपले अनुभव शेअर केले. त्यांनी सांगितलं की आजारी असतानाही त्यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम सुरू ठेवले होते. ‘न्यूज १८’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे अनुभव कथन केले.

हेही वाचा…अमिताभ बच्चन-जया यांचे आंतरजातीय लग्न लावण्यास भटजीने दिलेला नकार; बिग बींचे सासरे म्हणाले होते, “लग्नाचे विधी…”

कर्करोगाशी लढा देताना अनेक आव्हानांचा सामना करूनही त्यांनी या कार्यक्रमाबरोबरची आपली बांधिलकी कायम ठेवली, असं त्यांनी सांगितलं. किरण खेर म्हणाल्या, “मी त्या काळात अभिनय करत नव्हते. मी फक्त ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ करत होते आणि माझ्या मूळ गावी चंदीगडला गेले होते. मी या कार्यक्रमाशी माझी बांधिलकी जपली, पण चित्रपटासह बाकी सर्व प्रकारची कामं टाळली. जरी मी मोठ्या उपचार प्रक्रियेतून जात होते, तरी मी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ केलं. मी तो शो सोडू शकत नव्हते.” किरण खेर २००९ पासून ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

आजारापेक्षा उपचारांचे परिणाम जास्त वेदनादायी होते

किरण म्हणतात, “प्रत्येकाला कधी ना कधी असं काही होईल याची भीती वाटते. पण जेव्हा असं होतं, तेव्हा तुम्हाला ते स्वीकारणं गरजेचं असतं. या आजारात उपचारांमुळे निर्माण होणारे परिणाम जास्त वेदनादायी होते. पहिले सहा ते आठ महिने खूप कठीण गेले, पण नंतर मी सगळं देवावर सोडलं. माझा नेहमीच असा विश्वास आहे की काही लढाया देवच माझ्यासाठी लढत असतो, असं मी मानते.”

हेही वाचा…“त्याने मद्यप्राशन करण्याचा…”, अर्चना पूरन सिंहचे आमिर खानबद्दल मोठे वक्तव्य, “त्याची रूम माझ्याखोली शेजारी…”

किरण यांनी १९८३ मध्ये पंजाबी चित्रपट ‘आसरा प्यार दा’ मधून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘पेस्टोंजी’, ‘देवदास’, ‘मैं हूं ना’, ‘हम तुम’, ‘वीर-ज़ारा’, ‘मंगल पांडे: द राइजिंग’, ‘रंग दे बसंती’, ‘फना’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.