Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 5 : सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. वीकेंडला चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या कमाईचा वेग चांगलाच मंदावला आहे. त्यामुळे देशभरात या चित्रपटाला १०० कोटींचा आकडा गाठायला थोडी वाट पाहावी लागेल. चित्रपटाने सोमवारी १० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत त्यापेक्षाही घट नोंदवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चनच नाही तर चाहत्यांनी ‘या’ कलाकारांचीही बांधली मंदिरं, अंडरवर्ल्डशी संबंधांमुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रीचाही समावेश

चित्रपटाने पहिल्या दिवशी १५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ईदच्या सुट्टीचा फायदा मिळाला, त्यादिवशी चित्रपटाने २५ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २६ कोटींहून अधिक कमाई केली. तर, सोमवारी या चित्रपटाने सुमारे १० कोटींची कमाई केली होती. आता पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने मंगळवारी फक्त ७.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत सोमवारी मोठी घट; जाणून घ्या सलमानच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन

एकंदरीतच चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होत आहे. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत ८५.३४ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याचबरोबर जगभरात ‘किसी का भाई किसी की जान’ने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये सलमान खानसह पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. जस्सी गिल, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम हे सलमान खानच्या भावांच्या भूमिकेत आहेत. पलक तिवारी, शहनाज गिल आणि विनाली भटनागर त्यांच्या गर्लफ्रेंड्स भूमिकांमध्ये दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kisi ka bhai kisi ki jaan box office collection day 5 salman khan film earns 7 crore hrc