सलमान खानचा बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस घट नोंदवण्यात आली होती. सलमानचा मल्टिस्टार चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अपयशी पडल्याचे दिसून आले. मात्र, आता सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाने नुकतेच भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदर्शनाच्या दोन दिवसानंतर चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०५ कोटी रुपयांची कमाई केली. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने १७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमानच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपैकी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची सगळ्यात कमी कमाई ठरली आहे. चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत चांगली कमाई केली होती. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली. १४ व्या दिवशी चित्रपटाने ९० लाख रुपयांची कमाई केली.

हेही वाचा- सलमान खानबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत पलक तिवारीने पुन्हा दिलं स्पष्टीकरण; म्हणाली, “माझी चूक…”

चित्रपटाच्या अपयशानंतर सलमान खानचा मोठा निर्णय

पुढील वर्षी ईदला सलमान खानकडून त्यांच्या चाहत्यांना खास सरप्राइज मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ट्यूबलाइट’पासून ‘राधे’पर्यंत सलमानचे सध्या ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट फारसे चाललेले नाहीत. शिवाय नुकताच आलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू न शकल्याने पुढील चित्रपटांच्या बाबतीत सलमान खान विचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री अदा शर्मा भडकली, म्हणाली…

एका न्यूज पोर्टलनुसार सलमान खानला तब्बल सहा चित्रपट ऑफर झाले आहेत. आता नवीन चित्रपट करण्यास मात्र सलमान तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या ‘टायगर ३’ या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढे कोणत्या चित्रपटांना होकार द्यायचा, असा निर्णय सलमानने घेतल्याची चर्चा सुरू आहे. २०२४ च्या ईदला सलमानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नसेल ही गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक असेल. सलमानच्या ‘टायगर ३’ची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. याचे दिग्दर्शन मनीष शर्माने केले असून शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kisi ka bhai kisi ki jaan film crossed 100 crores on in indian box office dpj