भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अथिया व राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला. नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत अथिया व राहुलने लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

सुनील शेट्टीने प्रसार माध्यमांना के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नाची माहिती दिली. त्यानंतर आता अथिया व के.एल.राहुलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लग्नासाठी अथियाने बदामी रंगाचा लेहेंगा परिधान करत शाही लूक केला होता. सब्यसाची ब्रॅण्डकडून अथियाचा भरजरी लेहेंगा डिझाईन करण्यात आला होता. खड्यांच्या ज्वेलरीचा साज करत नववधू नटलेली पाहायला मिळाली. तर के.एल.राहुलने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. वराच्या पेहरावात के.एल.राहूल राजबिंडा दिसत होता.

हेही वाचा>> KL Rahul-Athiya Shetty Wedding: “मी सासरा झालो”, लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ व्हायरल

के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Story img Loader