भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सोमवारी (२३ जानेवारी) विवाहबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत के.एल.राहुल व अथिया शेट्टी यांनी सप्तपदी घेतली.

लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टी खूप खूश असल्याचं दिसलं. “मी सासरा झालो”, असं म्हणत त्याने प्रसारमाध्यमांसमोर त्याचा आनंद व्यक्त केला. परंतु, अथिया के.एल.राहुलबरोबर सप्तपदी घेत असताना सुनील शेट्टी भावूक झाला होता. बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, “सुनील शेट्टीचं व्यक्तिमत्त्व कूल अण्णा असं आहे. अथियाच्या लग्नात सुनील शेट्टी खूप आनंदी होता. पण के.एल.राहुलबरोबर सप्तपदी घेताना तो भावूक झालेला पाहायला मिळाला. लाडकी लेक सासरी चालल्याने त्याचे डोळे पाणावले होते”, असं अथिया व राहुलच्या लग्नात उपस्थितांपैकी एकाने सांगितलं आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”

हेही वाचा>>KL Rahul-Athiya Shetty Wedding: “मी सासरा झालो”, लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ व्हायरल

“अथिया शेट्टीचे वडील असूनही तिच्या लग्नात सुनील शेट्टी सगळ्यात जास्त व्यग्र होता. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार आणि इतर गोष्टींकडे तो स्वत:हून लक्ष घालत होता. लग्नानंतर प्रसारमाध्यमातील व्यक्तींनाही तो स्वत: जाऊन भेटला आणि मिठाई वाटली”, असंही पुढे त्या व्यक्तीने सांगितलं.

हेही पाहा>> KL Rahul-Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी-के.एल.राहुलने घेतली सप्तपदी, पाहा शाही विवाहसोहळ्यातील खास फोटो

अथिया व के.एल.राहुल अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता त्यांनी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. चाहत्यांसह बॉलिवूड व क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader