भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अथिया व राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. लग्नकार्यातील विधी पार पडत असून यादरम्यानच अथियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अथिया शेट्टीला हळद लावतानाचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये अथिया बदामी रंगाची साडी नेसल्याचं दिसत आहे. अथियाने फुलांची ज्वेलरी व साजेसा मेकअप केलेला दिसत आहे. अथिया व राहुलच्या हळदी समारंभातील हा फोटो असल्याचं म्हटलं जात आहे. या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. परंतु, या फोटोमागचं सत्य आता समोर आलं आहे.
हेही वाचा>> “घरातून लव्ह मॅरेजला…”, ‘रंग माझा वेगळा’मधील ‘दीपा’ची पोस्ट चर्चेत
अथियाचा हळदी समारंभातील फोटो हा त्यांच्या लग्नसोहळ्यातील नसून अभिनेत्रीच्या एका चित्रपटातील आहे. ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटातील अथियाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अथियाने बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसह स्क्रीन शेअर केली होती.
हेही वाचा>> ‘वेड’ चित्रपटातील सत्या व श्रावणीचं रोमँटिक गाणं प्रदर्शित, रितेश-जिनिलीयाच्या रोमान्सची दिसली झलक
के.एल.राहुल व अथिया शेट्टीच्या लग्नात बॉलिवूडमधील कलाकारांसह क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. शाहरुख खान, सलमान खान यांच्यासह विराट कोहली, अनुष्का शर्मा, एम.एस.धोनीही विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.