भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अथिया व राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला. नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत अथिया व राहुलने लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

अथिया व के.एल.राहुलच्या लग्नाची बातमी सुनील शेट्टीने प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यांच्या लग्नानंतर सुनील शेट्टीने मुलगा अहान शेट्टीबरोबर पापाराझींना प्रतिक्रिया दिली. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन सुनील शेट्टीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अथिया व के.एल.राहुलच्या लग्नाबाबत बोलताना सुनील शेट्टीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. “लग्न झालं आहे. सप्तपदीही घेऊन झाल्या आहेत. मी आता सासरा झालो”,असं सुनील शेट्टी व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

हेही वाचा>>के.एल.राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

हेही वाचा>> के.एल.राहुल-अथिया शेट्टीची लगीनघाई, अभिनेत्रीला हळद लावतानाचा फोटो व्हायरल

लग्नानंतर सुनील शेट्टी व अहान शेट्टीने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. सुनील शेट्टीने पापाराझींना मिठाई वाटत त्यांचे आभार मानले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेकीच्या लग्नात सुनील शेट्टीने खास लुंगी व सदरा असा पेहराव केला होता. अथिया व के.एल.राहुलच्या लग्नातील सुनील शेट्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही पाहा>> Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी

के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Story img Loader