अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या लग्नापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. क्रिकेटपटू केएल राहुल हा सुनील शेट्टीचा जावई होणार आहे.
सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांचे एकमेकांशी फार घनिष्ठ नातं आहे. ते दोघेही अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसतात. पण नेमकं कोणत्या कारणामुळे सुनील शेट्टींनी केएल राहुलला जावई म्हणून होकार दिला, असा प्रश्न उपस्थित केला जातो. नुकतंच यामागचे कारण समोर आले आहे.
आणखी वाचा : Athiya Shetty-KL Rahul Wedding Live: अथिया शेट्टी-केएल राहुल लवकरच घेणार सात फेरे, संजय दत्तने दिल्या शुभेच्छा
सुनील शेट्टीनी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुनील शेट्टीला अभिनयात रस नव्हता. त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते. त्यामुळे त्याने खेळावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. सुनील शेट्टींनी कधीच सिनेसृष्टीत अभिनय करण्याबद्दलचा विचार केला आहे.
“मला देशासाठी खेळायचे होते. खेळाडू होण्यासाठी मी मार्शल आर्ट शिकलो. त्याबरोबर मी फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. पण मी केलेले मार्शल आर्ट्स अभिनय आणि चित्रपटांमध्ये उपयुक्त येईल, याचा कधी विचारही केला नव्हता”, असे सुनील शेट्टीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
आणखी वाचा : अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाच्या धामधुमीत अजय देवगणचे मित्रासाठी खास ट्वीट, म्हणाला “अण्णा…”
सुनील शेट्टी आणि के.एल राहुल यांच्यात क्रिकेट हा महत्त्वाचा दुवा आहे. त्या दोघांनाही क्रिकेट प्रचंड आवडते. ते दोघेही क्रिकेटप्रेमी आहेत. अनेकदा ते यावर गप्पाही मारताना दिसतात. काही मीडिया रिपोर्टसनुसार क्रिकेटमुळेच सुनील शेट्टीने केएल राहुलला जावई म्हणून मान्यता दिल्याचे बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दल खरी माहिती समोर आलेली नाही.