सध्या सर्वत्र आयसीसी टी20 विश्वचषक २०२२ ची चर्चा आहे. या विश्वचषकामध्ये भारताने आत्तापर्यंत चार सामने खेळले आहेत. यातील तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळाला आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताचा उपकर्णधार केएल राहुलला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यावरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली होती. आधीच्या सामन्यांची कसर त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये भरुन काढत ३२ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा सामना पाहण्यासाठी अथिया शेट्टी स्टेडियममध्ये हजर होती. तिच्या उपस्थितीचा सकारात्मक परिणाम केलच्या खेळावर झाला असे त्याचे चाहते सोशल मीडियावर म्हणत होते. सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि भारतीय फलंदाज केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याला सुनीलने देखील मान्यता दिली आहे. मध्यंतरी ते लवकरच लग्न करणार आहे असे म्हटले जात होते.

आणखी वाचा – विचित्र आजारामुळे त्रस्त आहे वरुण धवन, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “शरीराचा तोल…”

आज अथियाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने केएल राहुलने त्यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना त्याने “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या असण्यानं सर्वकाही छान होतं”, असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने जोकरच्या इमोजोचा वापर केला आहे. हे फोटो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. त्यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो रिशेअर अथियाने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. त्यावर तिने ‘बेस्ट बॉय’ असे इंग्रजीमध्ये लिहिले आहे.

आणखी वाचा – “आम्ही भेटायचो, कारण…”; करण मेहराशी अफेअरच्या आरोपांबद्दल सुश्मिता सेनच्या वहिनीचं स्पष्टीकरण

२०१५ मध्ये अथियाने ‘हिरो’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ अशा काही चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. एका कॉमन मित्राद्वारे त्यांची पहिली भेट झाली होती. पुढे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul has shared a special post on his gf athiya shettys birthday yps
Show comments