अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी केली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांना इशा आणि आहाना या दोन मुली आहेत. परंतु मनोरंजनसृष्टीत त्यांच्या इतकी प्रसिद्धी त्यांच्या मुलींना मिळाली नाही. आज त्यांची मुलगी अहाना हिचा वाढदिवस आहे.

आई वडिलांप्रमाणे मनोरंजन सृष्टीत अहानाला यश मिळालं नाही. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अहानाने देखील मनोरंजन सृष्टीत आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. तिने ‘ना तुम जानो ना हम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. परंतु तिच्या वाट्याला यश आलं नाही. ऋतिक रोशन, सैफ अली खान ईशा देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने मनोरंजन क्षेत्राकडे पाठ फिरवली.

आणखी वाचा : “पती धर्मेंद्र यांच्याबरोबर राहत नाही कारण…”, हेमा मालिनींचा मोठा खुलासा

आहानाने २०१४ मध्ये दिल्लीत राहणाऱ्या वैभव वोहराशी लग्न केलं. लग्नाआधी दोघांनीही एकमेकांना खूप महिने डेट केलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अहानाने २०१५ मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. यानंतर त्यांना आणखी दोन मुलेही झाली.

हेही वाचा : वयाच्या ७४व्या वर्षी हेमा मालिनींनी हवेत तरंगत केला बॅले डान्स, भारावलेली लेक म्हणाली…

आता मनोरंज क्षेत्राच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहून अहाना तो सगळा वेळ तिच्या कुटुंबीयांना देते. याचबरोबर हेमा मालिनी यांच्याप्रमाणेच अहाना देखील उत्कृष्ट नृत्यंगना आहे. आतापर्यंत तिने अनेकदा आईबरोबर डान्स परफॉर्मन्सही दिले आहेत.

Story img Loader