अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी कंगना राणौतची निर्मिती असलेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. अल्पावधीच त्याने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’मधील फैजल खानच्या भूमिकेमुळे नवाजला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अभिनेत्याने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये गणेश गायतोंडेची भूमिका साकारून वेबसीरिजच्या विश्वातही आपला दबदबा निर्माण केला. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच्या संघर्षाबाबत नवाजने अनेकदा सांगितले आहे. परंतु, त्याची पहिली कमाई किती होती याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “१५० बायका ‘बाईपण भारी देवा’साठी भांडल्या…” सुकन्या मोनेंनी सांगितला राजस्थानातील किस्सा; म्हणाल्या, “मला ई-मेल…”

‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटात नवाजुद्दिनबरोबर अभिनेत्री अवनीत कौरने प्रमुख भूमिका साकारली होती. अवनीतने या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘टिकू वेड्स शेरू’ ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर अलीकडेच या दोघांनी कर्ली टेल्सच्या ‘तेरे गली मैं’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नवाजने त्याच्या पहिल्या कमाईबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : ‘जय शिवराय’ म्हणत सह्याद्रीच्या धबधब्यावर आकाश ठोसरने केलं थरारक रॅपलिंग, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “सेफ्टीबद्दल…”

नवाजुद्दिन म्हणाला, मी सुरुवातीच्या काळात नाटकांमध्ये आणि पथनाट्यांमध्ये काम केले आहे. तेव्हा माझ्या कमाईचे साधन पूर्णत: नाटक होते. माझी पहिली कमाई ५ हजार रुपये होती. त्यावेळी त्या ५ हजारांचे महत्त्व माझ्यासाठी खूप जास्त होते. नाटकांमध्ये जास्त पैसे नाही मिळत असे बरेच लोक म्हणतात पण, माझ्यासाठी तेव्हा नाटकात काम करणे महत्त्वाचे होते. मी अनेक पथनाट्यांमध्येही काम केले आहे.

हेही वाचा : “सहसा मी रडत नाही, पण…”, सुधा मूर्तींनी सांगितला किस्सा; म्हणाल्या, “आलिया भट्टचा अभिनय पाहून…”

“‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ चित्रपटातील शेवटचा सीन शूट करतानाच मला माहिती होते की, आता मी या इंडस्ट्रीत आलो आहे आणि मी नक्की मोठा होणार”, असे नवाजुद्दिनने सांगितले. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ मधील शेवटच्या सीनमध्ये नवाजुद्दिनने साकारलेले ‘फैजल खान’ हे पात्र खलनायकाला गोळ्या घालून मारत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about nawazuddin siddiqui first pay check and earnings through street play sva 00