बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते रणधीर कपूर गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आले आहेत. आज त्यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. त्यांच्या कामाबरोबरच त्यांचा वैयक्तिक आयुष्यही चांगलंच चर्चेत राहिलं. याचा मुख्य कारण होतं त्या आणि त्यांची पत्नी बबिता यांचं वेगळं राहणं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ मध्ये आलेल्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. त्यांचे वडील राज कपूर यांना रणधीर कपूर यांच्या अफेअर बद्दल कळतात “तू तिच्याशी लग्न कधी करणार आहेस?” असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळी त्या दोघांचा दोघांचाही लग्नाचा कोणताही प्लॅन नव्हता. पण घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्नगाठ बांधली.

आणखी वाचा : Video: “आमचं लग्न खोटं, मौलानाही खोटा…” राखी सावंतला संताप अनावर

लग्नानंतर त्यांना करिष्मा आणि करीना या दोन मुली झाल्या. त्यावेळी बबिता यांनी चित्रपटात काम करणं थांबवलं होतं. ८०च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांचा कारकिर्दीचा आलेख खाली घसरत होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होऊ लागले आणि त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. दारू पिण्याच्या सवयीमुळे बबिता यांनाही त्रास होऊ लागला. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. अखेर १९८८ साली त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि बबिता यांनी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळे राहायला सुरुवात केली.

हेही वाचा : “करीना आणि करिश्माने मला वडील म्हणून दत्तक घ्यावे”, रणधीर कपूर यांनी व्यक्त केली इच्छा

आता या घटनेला ३४ वर्षे झाली असली तरीही त्यांनी घटस्फोट घेतला नाही. त्यांच्यात मतभेद झाल्यानंतरही त्यांनी आपल्या दोन्ही मुलींवर एकत्र मिळून संस्कार केले. तर आजही रणधीर कपूर आणि बबिता अनेक कौटुंबिक समारंभांना एकत्र दिसतात.