बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी एकमेकांचे नातेवाईक आहे. करण जोहर व आदित्य चोप्रा एकमेकांचे नातेवाईक आहेत. किरण राव व अदिती राव हैदरी याही नात्याने बहिणी लागतात. असंच एक खास नातं कपूर व बच्चन कुटुंबातही आहे. हे नातं बिग बींचे जावई निखील नंदा यांच्यामुळे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानायक अमिताभ बच्चन व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचं लग्न निखिल नंदाशी झालं आहे. निखिल नंदा यांचं कपूर कुटुंबाशी जवळचं नातं आहे. रणबीर, करीना व करिश्मा कपूर ही भावंडं निखिल नंदा यांच्या मामांची मुलं आहेत. निखिल नंदा यांच्या वडिलांचं नाव राजन नंदा व आईचं नाव रितू नंदा आहे. रितू या राज कपूर व क्रिष्णा कपूर यांच्या कन्या होत्या. रीमा कपूर, राजीव कपूर, रणधीर कपूर व ऋषी कपूर ही रितू हे सख्खे भावंडं आहेत.

श्वेता बच्चनच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, पण जावई निखिल नंदांच्या वाढदिवसाचा सर्वांनाच पडला विसर, फक्त ‘या’ व्यक्तीने केली पोस्ट

श्वेता बच्चन यांचे पती निखिल नंदा हे करीना, करिश्मा व रणबीर यांचे आत्येभाऊ आहेत. निखिल यांच्या आईचं चार वर्षांपूर्वी २०२० मध्ये निधन झालं. निखिल हे उद्योगपती आहेत, ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. पण कपूर कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावतात. रणबीर, करीना व करिश्मा यांच्याबरोबर निखिल नंदा यांचे अनेक फोटो आहेत. निखील हे आपल्या मामांच्या कुटुंबाच्या फॅमिली फोटोमध्ये दिसतात.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

श्वेता बच्चन व निखील नंदा यांच्याविषयी बोलायचं झालं तर या दोघांचं लग्न १९९७ साली झालं होतं. या जोडप्याला अगस्त्य व नव्या नवेली ही दोन अपत्ये आहेत. अगस्त्य मामा व आजोबांप्रमाणे अभिनयक्षेत्रात आला आहे, तर नव्याने मात्र आपल्या वडिलांप्रमाणे उद्योजक होण्याचं ठरवलं आणि ती व्यवसाय करते. श्वेता अगस्त्यबरोबर मुंबईत राहते, तर निखिल व्यवसायानिमित्त दिल्लीत असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know amitabh bachchan son in law nikhil nanda relation with kapoor family hrc