दिवंगत राजेश खन्ना हे हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. एकेकाळी राजेश खन्ना यांनी संपूर्ण सिनेसृष्टी व्यापून टाकली होती. ‘दो रास्ते ‘, ‘आराधना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘बावर्ची ‘, ‘सफर ‘, ‘खामोशी’, ‘आनंद’, ‘अमर प्रेम’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. राजेश खन्ना यांनी लोकप्रियतेची एक वेगळीचं उंची गाठली होती, जी अजूनपर्यंत कुठलाही अभिनेता गाठू शकला नाही. राजेश खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया यांनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोघींना बॉलीवूडमध्ये तितकं यश मिळालं नाही.
ट्विंकल आणि रिंकीने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण, त्यांना काही काळानंतर जाणवलं की, आपण या क्षेत्रासाठी बनलो नाहीत. त्यामुळे ट्विंकलने आपल्या लेखणीने प्रेक्षकांची मनं जिंकली. एवढंच नव्हेतर ती निर्माती झाली. तर रिंकी खन्ना सतत चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे लग्न करून विदेशात स्थायिक झाली. ट्विंकल खन्नाचा पती कोण आहे हे सर्वश्रुत आहे. पण आज आपण रिंकी खन्नाच्या पतीबद्दल जाणून घेणार आहोत.
राजेश खन्नांचा धाकटा जावई कोण आहे?
राजेश खन्नांचा धाकटा जावई, रिंकी खन्नाच्या पतीचं नाव समीर सरन आहे. समीरचा बॉलिवूडशी काहीही संबंध नसला तरी तो एक श्रीमंत व्यक्ती असून कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. रिंकी खन्नाने १९९९मध्ये ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर रिंकीने बरेच चित्रपट केले. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘ये है जलवा’, ‘झंकार बीट्स’, ‘चमेली’ आणि ‘प्राण जाए पर शान ना जाए’ यांच्यासारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने काम केलं. पण रिंकीचं अभिनय क्षेत्रातील करिअर फ्लॉप ठरलं.
त्यानंतर रिंकी अभिनय क्षेत्रापासून दूर झाली. इ-टाइम्सच्या २००२मधील वृत्तानुसार, रिंकी खन्ना म्हणाली होती की, ती डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसलाच्या माध्यमातून समीर सरनला भेटली होती. त्यानंतर २००३मध्ये समीर सरनबरोबर तिनं लग्न केलं आणि लंडनला स्थायिक झाली. समीर सरन एक उद्योगपती आहे. कमाईच्या बाबतीत तो त्याच्या साडू म्हणजेच अक्षय कुमारपेक्षा कमी नाही.

समीर सरन एका रिअल इस्टेट फर्ममध्ये भागीदार होता. ज्याची शाखा मुंबई, गोवा, कोलकाता आणि बेंगळुरूसारख्या अनेक ठिकाणी आहे. आता समीर लंडनमध्ये उद्योग करत आहे. मूळचा तो कोलकाताचा राहणारा आहे. माहितीनुसार, समीर सरनकडे २५० कोटींची संपत्ती आहे.
अक्षय कुमारची संपत्ती
राजेश खन्ना यांचा थोरला जावई अक्षय कुमारने १९९१ मध्ये आलेल्या ‘सौगंध’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु त्याचा पहिला हिट चित्रपट १९९२ मध्ये झाला, त्याचं नाव होतं ‘खिलाडी.’ आता अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका चित्रपटासाठी ८० ते १०० कोटी रुपये घेतो. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ५०० कोटी रुपये आहे. अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे २७०० कोटी रुपये आहे.