बॉलीवूडमधील अनेक मोठे कलाकार हे त्यांच्या लाइफस्टाईलमुळे मोठ्या चर्चेत असतात. त्यांची सिक्युरिटी, बॉडीगार्ड हादेखील अनेकदा चर्चेचा विषय असतो. ऐश्वर्या राय-बच्चन(Aishwarya Rai Bachchan) ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती जर कोणत्या कार्यक्रमांना हजर राहत असेल, तर तिच्याबरोबर तिचा बॉडीगार्ड दिसतो आता तिच्या बॉडीगार्डचा नेमका पगार किती आहे, हे जाणून घेऊ.

ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डला किती पगार मिळतो?

अनेक वर्षांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर एक बॉडीगार्ड दिसतो. त्याचे नाव शिवराज असे आहे. तो ऐश्वर्या रायबरोबर अनेक ठिकाणी दिसतो. समोर आलेल्या माहितीनुसार, शिवराज हा बच्चन कुटुंबाचा एक भाग आहे. त्याचा पगार सुमारे महिन्याला सात लाख रुपये इतका आहे. ऐश्वर्याचा बॉडीगार्ड शिवराज हा तिच्याबरोबर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतो. ऐश्वर्याबरोबरचा त्याचा बॉण्डदेखील उत्तम असल्याचे पाहायला मिळते. ऐश्वर्या राय अनेकदा शिवराजच्या कार्यक्रमांनादेखील हजर राहताना दिसली आहे. ऐश्वर्याचा दुसरा बॉडीगार्ड राजेंद्र ढोले हादेखील अनेक वर्षांपासून काम करत आहे. ‘फिल्मी बीट’नुसार त्याचा वर्षाचा पगार एक कोटी आहे. तो ऐश्वर्याबरोबर चित्रपटांच्या सेटवर, ट्रिपदरम्यान सगळीकडे हजर राहत असल्याचे दिसते.

ऐश्वर्या काय बच्चन काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या कारला अपघात झाल्याचे समोर आले होते. ऐश्वर्या राय व तिची मुलगी आराध्या या बॉण्डिंगबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. आराध्या ऐश्वर्याबरोबर अनेक ठिकाणी दिसते. मायलेकीच्या या जोडीचे चाहतेही कौतुक करताना दिसतात. तसेच ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनादेखील उधाण आले होते. याचे कारण म्हणजे अनेक ठिकाणी ऐश्वर्या तिच्या लेकीबरोबर आणि अभिषेक बच्चन संपूर्ण बच्चन कुटुंबाबरोबर हजर राहिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमांना, तसेच काही कौटुंबिक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

दरम्यान, ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली होती. २०११ साली त्यांना मुलगी झाली. आराध्या असे तिचे नाव आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ऐश्वर्या पोन्नियिन सेल्वन २ मध्ये दिसली होती. तिच्या या भूमिकेचे मोठे कौतुक होताना दिसले. आता ती आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटात दिसला होता.