आज सगळीकडे मैत्री दिन साजरा केला जात आहे. बॉलीवूडमध्ये मैत्रीच्या नात्यावर असे अनेक चित्रपट आहेत की, जे प्रेक्षकांच्या जवळचे आहेत. तसेच असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांची पडद्यावरील मैत्री प्रेक्षकांना आवडते. मात्र, चित्रपटांबरोबरच बॉलीवूडमधील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील त्यांचे मित्र कोण? याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बॉलीवूडमधील कलाकारांच्या मैत्रीविषयी जाणून घेऊ.

सलमान खान आणि शाहरुख खान

सलमान खान आणि शाहरुख खान हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. त्यांनी १९९० च्या दशकात अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘करण-अर्जुन’ चित्रपटानंतर या जोडीला मोठी लोकप्रियता मिळाली होती. चित्रपटांशिवाय त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मैत्रीचेही कौतुक होताना दिसते. २००० च्या दशकात त्यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री पाहायला मिळत होती. समोर आलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत घडलेल्या एका घटनेनंतर या दोघांच्या मैत्रीत फूट पडली होती. मात्र, २०१३ मध्ये त्यांनी परत एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली.

zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
sunny deol bobby deol live
सनी देओल व बॉबी देओल यांची LIVE मुलाखत, वैयक्तिक आयुष्य, फिल्मी करिअर अन् बरंच काही!
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

काही दिवसांपूर्वीच जेव्हा शाहरुखच्या मुलाचे आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. त्यावेळी सलमानने किंग खानच्या घरी जात त्याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर हे दोघे ‘पठाण’ चित्रपटात एकत्र दिसले होते. प्रेक्षकांना त्यांना एकत्र पाहायला आवडते, हे यानिमित्ताने पु्न्हा एकदा समोर आले. दोघेही अभिनेते आपापल्या अनेक मुलाखतींमधून एकमेकांबद्दल आदर वाटत असल्याचे सांगत असतात. ते कायम एकमेकांना पाठिंबा देत असल्याचेही पाहायला मिळते. त्यामुळे चाहते या जोडीला करण-अर्जुन, असे संबोधताना दिसतात.

हेही वाचा: Video: “तेरी मेरी यारिया…”, ‘बिग बॉस मराठी’ विजेती मेघा धाडेची फ्रेंडशिप डेनिमित्ताने ‘यांच्या’साठी खास पोस्ट, सई किंवा पुष्कर नव्हे तर…

अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर

बॉलीवूडमधील आणखी एक प्रसिद्ध मैत्री अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांची आहे. अयान हा चित्रपट निर्माता असून, त्याच्या पहिल्या ‘वेक अप सिड’ या २००९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर रणबीरने अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘ब्रह्मास्त्र भाग १ : शिवा’मध्ये काम केले. चित्रपटांशिवायदेखील खासगी आयुष्यातदेखील ते अनेकदा एकत्र दिसतात. अयान रणबीरची मुलगी राहाला बाहेर फिरायला घेऊन जात असल्याचे पाहायला मिळते. त्याशिवाय रणबीरची पत्नी व अभिनेत्री आलिया भट्टचेही अयानबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दिसते.

करण जोहर आणि फराह खान

करण जोहर आणि फराह खान हे दोघेही बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जातात. त्याबरोबरच त्यांच्या मैत्रीची अनेकदा चर्चा होताना दिसते. ‘कभी अलविदा ना कहना’, ‘ओम शांती ओम’ या लोकप्रिय चित्रपटांत एकत्र काम करण्यापासून अनेक कार्यक्रमांत ते एकत्र हजेरी लावताना दिसतात.

अनन्या पांडे, सुहाना खान व शनाया कपूर

बॉलीवूडमधील आजच्या पिढीतील या तिघींच्या मैत्रीचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते. अनेक कार्यक्रमांना अनन्या, सुहाना व शनाया एकत्र हजेरी लावताना दिसतात. त्याबरोबरच अनेकदा त्या एकत्र वेळ घालवतानाही दिसतात.

करीना कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा व करिश्मा कपूर

बॉलीवूडमधील या चौघींची मैत्रीदेखील प्रसिद्ध आहे. अनेकदा त्या एकत्र वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात. करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी सार्वजनिकरीत्या आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच सारा अली खान आणि अनन्या पांडे, रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांची मैत्रीदेखील सर्वांना माहीत आहे.

Story img Loader