अभिनेते मनोज बाजपेयी यांची अभिनयशैली जेवढी जास्त चर्चेत असते तेवढीच चर्चेत असतं त्यांचं वैयक्तिक आयुष्य. त्यांचं बालपण, गावाकडच्या आठवणी याबद्दल ते अनेकदा अनेक मुलाखतींमध्ये बोलले आहेत. पण तुम्हाला अभिनेता मनोज बाजपेयी याचं टोपणनाव माहीत आहे का? दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि मनोज बाजपेयी यांची पहिली भेट कुठे झाली होती हे माहित आहे का? हा किस्सा पूर्ण ऐकायचा असेल तर तुम्हाला ‘गोष्ट पडद्यामागची’चा हा भाग पूर्ण पाहावा लागेल.