Rahat Fateh Ali Khan Arrest in Dubai Airport: पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना दुबईत विमानतळावर अटक करण्यात आली आहे. दुबईतल्या बुर्ज दुबई पोलीस स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. मॅनेजर सलमान अहमद यांच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आली. दुबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नेमकं काय घडलं? (Rahat Fateh Ali Khan Arrested )

दुबईतील एका कॉन्सर्टवरुन गायक राहत फतेह अली खान Rahat Fateh Ali Khan आणि त्यांचा मॅनेजर अहमद सलमान यांच्यात वाद झाला होता. शोचं आयोजन आणि आर्थिक देवाण-घेवाणीवरुन दोघांमधील हा वाद पोलिस ठाण्यात गेला. ज्यानंतर पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर कारवाई करण्यात आली. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. दुबईतील शो केल्यानंतर परतत असताना दुबई पोलिसांनी थेट विमानतळावरुनच राहत फतेह अली खान यांना अटक केली आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?

हे पण वाचा- Video: लग्नात सोनाक्षी सिन्हाने राहत फतेह अली खानच्या गाण्यावर ‘अशी’ केली जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

ANI च्या वृत्तानुसार सलमान अहमद हा राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांचा माजी मॅनेजर होता. त्याने दुबई पोलिसांकडे राहत फतेह अली खान यांच्यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती. काही महिन्यांपूर्वी वाद झाल्याने त्याला राहत फतेह अली खान यांनी कामावरुन काढून टाकली होती. ज्यानंतर या मॅनेजरने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज दुबईत ही कारवाई करण्यात आली आहे. जिओ न्यूजनेही हे वृत्त दिल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

rahat fateh ali khan Arrested
राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

यापूर्वीची गायक राहत फतेह अली खान वादात अडकले होते

यापूर्वीही गायक राहत फतेह अली खान मोठ्या वादात अडकले होते. त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चपलेने मारताना दिसले. मात्र, या व्हिडीओची जबाबदारी घेत त्यांनी माफीही मागितली होती. व्हिडिओत राहत फतेह अली खान नोकराला बेदम मारहाण करताना दिसले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं. त्यानंतर, अली खान यांना उपरती आली अन् त्यांनी माफी देखील मागितली. दारुची बाटली गायब झाल्याने त्यांनी नोकराला चपलेने मारहाण करण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. आता त्यांच्या माजी मॅनेजरने त्यांच्याविरोधात तक्रार केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. राहत अली फतेह अली खान हे प्रसिद्ध गायक नुसरत फतेह अली खान यांचे पुत्र आहेत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांसाठीही गाणी म्हटली आहेत.

Story img Loader