अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. विकी व कतरिना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतंच एका कार्यक्रमात विकीने त्याची पत्नी कतरिनाबाबत अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा- प्रसिद्ध रॅपर बादशाह पाकिस्तानी अभिनेत्रीला करतोय डेट? फोटो झाले व्हायरल

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
A sailor on a fishing boat in Ratnagiri cut off Tandela head and set the boat on fire
रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून; देवगड समुद्रात घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ
shashank ketkar shares angry post after seen garbage on the road
“ठाणे महानगरपालिका झोपलीये…”, कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर संतापला! म्हणाला, “दारूच्या बाटल्या, तंबाखू…”
krushna abhishek govinda feud ended
अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”
Annu Kapoor recalls on kiss controversy
Annu Kapoor: “मी हिरो असतो तर…”, प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार, संतापलेले अन्नू कपूर काय म्हणाले?
political twist in the suicide of a professional DJ
भंडारा : डीजे व्यावसायिकाच्या आत्महत्येला राजकीय वळण
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल

नुकतंच विकी कौशल आणि अभिनेत्री कियारा अडवाणीने करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात विकीने आपल्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने विकीला तुमचा पार्टनर तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारतो? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत विकी म्हणाला, “कतरिना मला बूबू, बेबी आणि ऐ म्हणून हाक मारते.” विकीचं हे उत्तर ऐकून कियारा व करण जोरजोरात हसायला लागले.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनाकडून काय शिकायला मिळालं याबाबत विकीने खुलासा केला होता. विकी म्हणालेला, “माझ्या फॅशनवरुन कतरिना मला त्याला ओरडत असते. मी काय घालायला पाहिजे हे कतरिनाच ठरवते आणि तसं झालं नाही तर ती मला सरळ सरळ काय जोकर दिसत आहेस असं म्हणते.”

हेही वाचा- परेश रावल यांची दोन्ही मुलं काय करतात? स्वतःच केला खुलासा; म्हणाले, “त्यांनी माझ्या नावाचा…”

विकी कौशलच्या कामाबाबत बोलायचं झालं तर नुकताच विकीचा ‘सॅम बहादुर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकीने सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने २५.५५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात विकी शिवाय सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.