रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. लवकरच ही लोकप्रिय जोडी ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : भिंतीवर वदनी कवळ श्लोक, पुण्यातील जुने फोटो अन्…; ‘असं’ आहे अनघा अतुलचं नवीन हॉटेल, शेअर केला पहिला व्हिडीओ

‘कॉफी विथ करण’मधील रणवीर-दीपिकाच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर लीक झाला आहे. हा व्हिडीओ अद्याप करणने अधिकृतरित्या शेअर केलेला नाही. यामध्ये बॉलीवूडची लाडकी जोडी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसत आहे. करण दोघांची स्तुती करताना “तुम्ही हॉट आहात” असे म्हणतो. यावर रणवीर त्याला “तुझ्याशी मी नंतर बोलेन ठरकी अंकल” असं मजेशीर उत्तर त्याला देतो.

हेही वाचा : जॅकी श्रॉफ ते महेश कोठारे ‘या’ कलाकारांनी घेतली मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट; काय आहे कारण?

‘कॉफी विथ करण’च्या व्हायरल व्हिडीओमध्ये रणवीर-दीपिकाने वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केल्याचं पाहायला मिळालं. करणने दोघांनाही त्यांनी गुपचूप केलेल्या साखरपुड्याबद्दल प्रश्न विचारला. यावर रणवीर-दीपिका म्हणाले, “हो, आम्ही २०१५ मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता.” पहिल्यांदा रणवीरने अभिनेत्रीला लग्नासाठी मागणी घातली होती. यावर तो म्हणाला, “इतर कोणी आमच्यामध्ये येईल किंवा हिला लग्नासाठी विचारेल तोपर्यंत मी आधीच ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं.”

हेही वाचा : Video : “कंजूसला इंग्रजीत काय म्हणतात?”, भन्नाट उत्तर देत जिनिलीयाने केली रितेश देशमुखची बोलती बंद, व्हिडीओ व्हायरल

रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने दीपिकाला “तू रॉकी रंधावाशी लग्न करशील का?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने “मी आधीच रॉकी रंधावाशी लग्न केलं आहे.” असं उत्तर दिलं. तसेच रणवीरशिवाय हृतिक रोशनसह माझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली दिसते असं दीपिकाने रॅपिड फायरमध्ये सांगितलं. दरम्यान, ‘कॉफी विथ करण’च्या नव्या प्रोमोची सुरूवात २६ ऑक्टोबरपासून होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffee with karan 8 ranveer singh reveals he was secretly engaged to deepika padukone in 2015 new promo leaked sva 00