‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. २६ ऑक्टोबरपासून या पर्वाला सुरुवात झाली. आतापर्यंत करणच्या या शोमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. नुकत्याच या कार्यक्रमात अभिनेता सैफ अली खान व त्याची आई अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, शर्मिला यांनी या कार्यक्रमात सैफ व अमृता सिंह यांच्या घटस्फोटावर पहिल्यांदा वक्तव्य केले आहे.
सैफने अमृतापासून वेगळे होण्याचा निर्णय पहिल्यांदा आई शर्मिला यांनाच सांगितला होता. शर्मिला म्हणाल्या, “त्यावेळी केवळ सैफलाच नाही, तर संपूर्ण कुटुंबालाच अमृता, सारा व इब्राहिमच्या लांब जाण्याचे दुःख सहन करावे लागले होते. जेव्हा दोन व्यक्ती जास्त काळ एकत्र राहतात आणि जर त्यांना दोन गोड मुलं असतील, तर साहजिकच ब्रेकअप त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नसते. मला कल्पना आहे की, त्या वेळेस जुळवून घेणं खूप अवघड जातं. प्रत्येकाला त्रास होत असतो. ते दिवस चांगले नव्हतेच; पण तरीही मी प्रयत्न केले.”
हेही वाचा-
शर्मिला पुढे म्हणाल्या, “हे फक्त लांब राहण्यापुरतंच मर्यादित नव्हतं; तर त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश होता. आमच्यासाठी तो आनंदाचा काळ नव्हता. कारण- इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता आणि आमचं मुलांवर खूप प्रेम होतं. विशेषतः टायगरचे (सैफ अली खानचे वडील) इब्राहिमवर मनापासून प्रेम होते. ते म्हणायचे, ‘तो एक चांगला मुलगा आहे.’ टायगर यांना इब्राहिमबरोबर म्हणावा तेवढा वेळ घालवायला मिळाला नाही. त्यामुळे अमृता व दोन्ही मुलांपासून विभक्त झाल्यानंतर आम्हाला दुहेरी नुकसान झाले. त्यामुळे सैफलाच नाही, तर आम्हालाही या सगळ्याशी जुळवून घ्यावं लागलं.”
हेही वाचा- ‘सौदागर’नंतर गोविंद नामदेव यांनी कधीच सुभाष घईंबरोबर काम केलं नाही; अभिनेत्याने सांगितलं नेमकं कारण
सैफ अली खान व अमृता सिंह यांनी ऑक्टोबर १९९१ मध्ये लग्न केले. दोघांमध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. लग्नानंतर काही कारणांमुळे त्यांच्यात मतभेद होऊ लागले आणि २००४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सैफ व अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. अमृता सिंहबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांनी कोर्टात जाऊन शासकीय पद्धतीने लग्न केले. करीना व सैफला दोन मुले असून, तैमूर आणि जहांगीर अशी त्यांची नावे आहेत.