सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बी टाऊनमधील लोकप्रिय दाम्पत्य आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सिद्धार्थ आणि कियारा करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमात सिद्धार्थने तो कियाराला कोणत्या नावाने हाक मारतो याबाबतचा खुलासा केला आहे.
करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन सुरू आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन हजेरी लावणार आहेत. करणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या भागाचा प्रोमोही शेअर केला आहे. या भागात सिद्धार्थ आणि वरुण आपल्या करिअरबाबत अनेक खुलासे करताना दिसत आहेत. ११ वर्षांपूर्वी सिद्धार्थ आणि वरुणने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
या भागात करण सिद्धार्थला विचारतो की, अशी कोणती तीन नावे आहेत; ज्यांचा वापर करीत तू तुझ्या बायकोला हाक मारतोस? करणसे असे विचारल्यावर उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला की, मी कियाराला लव, की व बे या नावांनी हाक मारतो. सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या कामकाजाबाबत बोलायचे झाले, तर काही महिन्यांपूर्वीच कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्याबरोबर कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने खूप कमी कमाई केली होती. आता लवकरच ती साऊथचा सुपरस्टार राम चरणबरोबर ‘गेम चेंजर’ चित्रपटात झळकणार आहे.
तर, सिद्धार्थ ‘योद्धा’ चित्रपटात झळकणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट १५ मार्च २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘भारतीय पुलिस बल’ चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटवर पदार्पण करणार आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंह, मुकेश ऋषी व ललित परिमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.