‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनला सध्या प्रेक्षकांकडून भरभरून पसंती मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांनी हजेरी लावली होती. यावेळी या दोन्ही अभिनेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

वैयक्तिक आयुष्यात वरुण धवनने त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल, तर सिद्धार्थने बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीशी लग्न केलं आहे. करणला सिद्धार्थ-कियाराचं रिलेशनशिप आणि ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज एका पार्टीदरम्यान आला होता. याविषयी सांगताना करण म्हणाला, “मला चांगलंच आठवतंय त्यावेळी या दोघांची (सिद्धार्थ-कियारा) भांडणं झाली होती. सिडला खूप ताप होता तरी तो माझ्या पार्टीला उपस्थित राहिला होता.”

हेही वाचा : “माझा ड्रायव्हर वैतागलाय…”, प्राजक्ता माळीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…

करण पुढे म्हणाला, “कियारा सुद्धा माझ्या पार्टीला आली होती. पण, पार्टीत सुरूवातीला ते दोघं एकमेकांशी जास्त बोलत नव्हते. आधी भांडले आणि पुढे अगदी दोन तासांत त्यांचं भांडण मिटलं आणि त्यानंतर मी किआरा स्वत:च्या हाताने सिद्धार्थला जेवण भरवत असल्याचं पाहिलं. त्या क्षणी मला जाणवलं दोघांमध्ये सुंदर नातं आहे आणि लवकरच दोघेही लग्न करतील.”

यावर वरुण म्हणाला, “कियारा आणि मी आम्ही दोघं एका गाण्याचं शूटिंग करून निघालो होतो. तेव्हा कियारा गाडीत प्रचंड आनंदी होती. कारण, सिद्धार्थ तिला भेटायला येणार होता. ‘सिद्धार्थ मला भेटायला येतोय…त्याला ताप आलाय तरीही येतोय’ असं ती मला सारखं सांगत होती. तेव्हा मला सुद्धा त्यांचं प्रेम जाणवलं”

हेही वाचा : करण जोहर बनवणार ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे खुलासा करत म्हणाला, “मी स्पष्टपणे…”

दरम्यान, सिद्धार्थ-कियाराने एकत्र ‘शेरशाह’ चित्रपटात काम केलं आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर सिद्धार्थ-कियाराने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न केलं. या लग्नाला करण जोहर सुद्धा उपस्थित होता.

Story img Loader