बॉलीवूडची ‘रामलीला’ जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. रणवीर-दीपिकाने २०१२ पासून एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. पुढे २०१५ मध्ये दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकला होता. या सगळ्या वैयक्तिक गोष्टींचा खुलासा दोघांनीही ‘कॉफी विथ करण’मध्ये केला आहे. ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनच्या पहिल्या भागात रणवीर-दीपिका या बॉलीवूडच्या स्टार जोडीने हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : आईचे संस्कार, शिक्षण ते स्वातंत्र्य लढा! ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ब्लॅक अँड व्हाइट ट्रेलर प्रदर्शित

‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीर-दीपिकाने त्यांच्या लग्नातील Unseen व्हिडीओ प्रदर्शित केला. या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. करणने या कार्यक्रमात दोघांनाही, पदुकोण कुटुंबीयांना तुमच्या नात्याबद्दल कोणी व कसं सांगितलं? हा प्रश्न विचारला. यावर दीपिका म्हणाली, “मालदिवसमध्ये निळ्याशार समुद्राच्या मध्यभागी रणवीरने मला लग्नासाठी विचारलं. तेव्हा मी खूपच भावुक झाले होते. त्यानंतर मालदिवहून थेट बंगळुरूला जाऊन आई-बाबांना सर्व सांगायाचं हे त्याने आधीच ठरवलं होतं.”

हेही वाचा : अंकिता लोखंडेची सुशांतशी ब्रेकअपनंतर झालेली ‘अशी’ अवस्था, म्हणाली, “मी विकीला म्हणायचे की तो…”

दीपिका पुढे म्हणाली, “मी आणि रणवीर आम्ही दोघंही माझ्या आई-बाबांच्या घरी पोहोचलो. त्यांना आम्ही काय बोलणार? कशासाठी आलो आहोत याबद्दल काहीच कल्पना नव्हती. जेवणाच्या टेबलवर मी दोन वेळा रणवीरला तू सांगून टाक आपल्याबद्दल असं खुणावलं. शेवटी मी मोठ्या आवाजात रणवीरने मला लग्नासाठी विचारलं आहे…मी त्याला होकार कळवला आहे असं अनिषा आणि आई-बाबांसमोर जाहीर केलं.”

हेही वाचा : ‘रामायण’मधील हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलने आकारली मोठी रक्कम; ‘इतक्या’ कोटींचे घेतले मानधन

“आधी हसत-खेळत वातावरणात आम्ही जेवत होतो. त्यानंतर मी आमच्या नात्याबद्दल मोठ्या आवाजात एकदाच आई-बाबांना सांगितलं. अचानक जेवणाच्या टेबलावर एकच शांतता पसरली. कोणी काहीच बोलत नव्हतं अर्थात त्यांच्यासाठी लेकीचं लग्न ही खूप मोठी गोष्ट होती. तिथून माझ्या अम्माने थेट मला एका खोलीत नेलं आणि विचारलं हा मुलगा कोण आहे. तू लग्नाचा निर्णय एवढ्या लगेच कसा घेतलास?” असं दीपिकाने सांगितलं. यावर रणवीर म्हणाला, “मी दीपिका आणि तिच्या आईचं बोलणं दरवाजावर कान लावून ऐकत होतो. तेव्हा त्या दीपिकाला अनेक प्रश्न विचारत होत्या पण, आता दीपिका-अनिशापेक्षा मी त्यांचा सगळ्यात आवडता मुलगा आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffee with karan season 8 deepika padukone reveals her mom reaction after she knew about ranveer deepika relationship sva 00