काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतरही त्यांची जादू सिनेरसिकांच्या मनावर असते. असाच एक चित्रपट म्हणजे ‘कोई मिल गया’. हृतिक रोशन व प्रीती झिंटाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. यातील गाणी तर आजही लोकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटातील जादू हे एलियनचं पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं.

याबरोबरच चित्रपटात हृतिकच्या समोर व्हिलनच्या रूपात होतं राज हे पात्र. हे पात्र रजत बेदी या अभिनेत्याने निभावलं होतं. या चित्रपटानंतर मात्र रजत बेदी मनोरंजनसृष्टीपासून दूर फेकला गेला. यानंतर रजतने अभिनयातून ब्रेक घेतला अन् तो कॅनडाला स्थायिक झाला.

Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Canada Khalistani
Canada : कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराचा कार्यक्रम रद्द; खलिस्तानी धमकीमुळे हिंसाचाराची भीती
Hardeep Singh Nijjar aide Arsh Dala Arrested
भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला कॅनडात अटक; खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा निकटवर्तीय अर्श डल्ला कोण आहे?
maharashtra assembly election 2024 sharad pawars ncp fight in satara district
साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई
Hyderabad Man Shoots At Girlfriend Father With Air Gun accused arrested
प्रेयसीला अमेरिकेला पाठवलं म्हणून संतापलेल्या प्रियकराने तिच्या वडिलांवर केला गोळीबार; कुठे घडली घटना?

आणखी वाचा : ४८ वर्षांपूर्वीची आणीबाणी कुणीही विसरलेलं नाही; या कालखंडावर बेतलेले ‘हे’ बॉलिवूड चित्रपट पाहिलेत का?

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान त्याने अभिनयातून ब्रेक घेण्याबद्दल अन् ‘कोई मिल गया’सारख्या चित्रपटानंतर घडलेल्या बदलांविषयी भाष्य केलं आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांच्याशी संवाद साधताना रजत बेदी म्हणाला, “कोई मिल गया सुपरहीट ठरूनही मला त्याचा काहीच फायदा नव्हता. चित्रपटात माझे प्रीती आणि हृतिकबरोबर बरेच सीन्स होते, पण शेवटी जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यापैकी बरेच सीन्स काढून टाकण्यात आले होते.”

पुढे रजत म्हणाला, “कोई मिल गया जसा प्रदर्शित झाला तसं मला निर्मात्यांनी अगदी खड्यासारखं बाजूला केलं याचं वाईट वाटतं. त्यानंतर मी सनी देओल यांच्याबरोबर एका चित्रपटात काम करत होतो. त्यावेळी मला मिळालेले सगळे मानधनाचे चेक बाऊन्स झाले, एकही चेक वठला नाही. मला चित्रपट, प्रसिद्धी मिळत होती पण घर चालवण्यासाठी एवढंच पुरेसं नाही, माझी प्रगती कशी होणार? असं मला सतत वाटायचं.”

रजतने ‘चालबाज’, ‘जानी दुश्मन : अनोखी प्रेम कहानी’, ‘रॉकी’सारख्या चित्रपटात काम केलं आहे. २००३ मध्ये आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतलं अन् प्रत्येक कलाकाराच्या लोकप्रियतेमध्ये भर पडली.